चित्रपसृष्टी हादरली! आणखी एका विनोदी अभिनेत्याचे निधन; अभिनय क्षेत्रात शोककळा, १००हून अधिक चित्रपटात साकारली होती भूमिका

मुंबई |  गेल्या काही दिवसांपासून अभिनय क्षेत्रातील अनेक दिग्गज मान्यवर जगाचा निरोप घेत आहेत. त्यामुळे अभिनय क्षेत्राला कोणाची नजर तर लागली नाही ना? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. या वर्षात अनेक कलाकार जग सोडून गेले आहेत.

त्यात लता मंगेशकर, बप्पी लहरी, केके, रमेश देव, रसिक दवे यांच्या सारख्या दिग्गजांनी जगाचा निरोप घेतला आहे. लता मंगेशकर यांच्या निधनाने तर पूर्ण जगावर शोककळा पसरली आहे. अनेक दिवस रुग्णालयात राहिल्या नंतर अखेर लता मंगेशकर यांनी जगाचा निरोप घेतला.

त्यांनी अनेक गाणी गाऊन करोडो चाहत्यांच्या मनावर राज्य केलं आहे. सध्या बॉलिवूड, हॉलिवुड, आणि मराठी चित्रपट सृष्टीत देखील कलाकारांचे निधन होत आहे. त्यामुळे कोणाची नजर लागली असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. सध्या आणखी एका दिग्गज कलाकाराचे निधन झाले आहे.

Advertisement

पॉज़ विद सैम जे” या मालिकेतील प्रसिद्ध अभिनेता रेडी रे याचं निधन झालं आहे. त्याच्या निधनाने चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. खूप कमी वयात त्याने या जगाचा निरोप घेतला. वयाच्या अवघ्या ३२ व्या वर्षी त्याची प्राण ज्योत मालवली. त्याने आता पर्यंत अनेक चित्रपटांमध्ये काम केले. त्याच्या विनोदी भूमिका खूप गाजल्या आहेत.

त्याच्या विनोदी अभिनयामुळे त्याची प्रसिद्धी अफाट होती. त्याचे खरे नाव थिअडोर ब्राउन असे होते मात्र त्याच्या कारकिर्दीमुळे त्याला रेडी रे हे नाव पडले होते. अजून त्याला याच नावाने ओळखतात. या विनोदी अभिनेत्याच्या निधनाने सर्वांना धक्का बसला आहे मात्र त्याच्या मृत्यूचे गुड अद्याप अस्पष्ट आहे.

Advertisement

लॉस एंजिल्स टाइम्समध्ये त्याच्या निधनाची माहिती मिळाली. दक्षिण कॅलिफोर्नियातील शुक्रवारी सकाळी त्याने या जगाचा निरोप घेतला. लग्नानंतर आता सोशल मीडियावर अनेक जण दुःख व्यक्त करत आहेत. त्याचबरोबर अनेक कलाकारांनी देखील सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत त्याला श्रद्धांजली वाहिली आहे.

टीव्ही नेटवर्क कॉमेडी सेंट्रल या कंपनीने एक ट्विट शेअर करत लिहिले आहे की, ” टेडी रे हा एक उत्तम विनोदी अभिनेता होता. त्याच्या निधनाने मनोरंजन विश्वात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. त्याची आम्हाला नेहमीच आठवण येत राहील.”

या अभिनेत्याने ऑफ डेफ डिजिटल या कंपनीसाठी देखील बराच काळ काम केले त्यामुळे त्यांनी देखील ट्विट करत लिहिले आहे की, ” आम्ही दररोज त्याला खूप मिस करू, तू स्वर्गातून आम्हाला पाहून नेहमीच हसत राहील.”

“पॉज विथ सॅम जे” मध्ये रेने बेलीफ हे पात्र साकारले होते. येताना दमदार अभिनय केला होता. यातील त्याच्या अभिनयाचे सर्वत्र कौतुक झाले. “कॅन्सल्ड कोर्ट ” या मालिकेमध्ये देखील त्याच्या अभिनयाची झलक पाहायला मिळाली.

तो एक स्टॅंडर्ड कॉमेडियन होता. त्यामुळे अनेक कार्यक्रमांमध्ये त्याचा विनोदी अभिनय पाहायला मिळायचा. आपल्या विनोदाबरोबरच तो अभिनयामध्ये देखील पारंगत होता. अनेक व्यक्ती त्याच्या निधनावर भाऊक झाले आहेत.

पूर्ण बातमी वाचा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *