प्रसिध्द विनोदी अभिनेते राजू श्रीवास्तव यांची प्रकृती चिंताजनक; डॉक्टर म्हणाले…

मुंबई | मनोरंजन विश्वातून आता पुन्हा एकदा मोठी खळबळ जनक बातमी समोर येत आहे. प्रसिद्ध कॉमेडियन असलेल्या एका कलाकाराला हृदयविकाराचा झटका आला आहे. त्यामुळे तातडीने त्यांना एका रुग्णालयात हालवल्यात आले. यामुळे सगळीकडे चिंतेचे वातावरण पसरले आहे.

 

आपल्या विनोदी अभिनयाने सर्वांना हसवणारे राजू श्रीवास्तव हे जिममध्ये असताना ट्रेडमिल वरती व्यायाम करत होते. ट्रेडमीलवर चालण्याचा व्यायाम करत असताना अचानक त्यांना अस्वस्थ वाटू लागले. छातीत चमक मारू लागली आणि ते खाली पडले. यावेळी त्यांना त्वरित नजीकच्या रुग्णालयात दाखल केले गेले. इथे आल्यानंतर आता त्यांची प्रकृती स्थिरावली असल्याचं समजलं आहे.

Advertisement

 

तसेच माध्यमांमध्ये आलेल्या माहितीनुसार. राजू श्रीवास्तव यांना ब्लॉकेज झाले आहेत. त्यामुळे लवकरच त्यांची बायपास सर्जरी देखील करावी लागणार आहे. मात्र यासाठी डॉक्टरांनी त्यांचे आधीचे रिपोर्ट घेऊन येण्यास सांगितले आहे. रिपोर्ट आल्यानंतरच त्यांची ही सर्जरी सुरू होईल. राजू श्रीवास्तव हे भाजपचे एक नेते असून उत्तर प्रदेश फिल्म विकास परिषदेचे ते चेअरमन देखील आहेत.

Advertisement

 

आतापर्यंत त्यांनी अनेक कॉमेडी शो मध्ये सहभाग घेतला आहे. आपल्या विनोदी अभिनेत्यांनी अनेक बॉलीवूड चित्रपटांमध्ये देखील दाखवला आहे. त्यांच्या दमदार विनोदी अभिनयामुळे त्यांचा चाहता वर्ग खूप मोठा आहे. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची ही बातमी त्यांच्या चाहत्यांपर्यंत वाऱ्याच्या वेगाने पसरली आहे. त्यामुळे सर्वजण राजू श्रीवास्तव यांच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी अशी प्रार्थना करत आहेत.

पूर्ण बातमी वाचा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *