प्रसिध्द अभिनेत्रीचे निधन; दोन वेळेस आला पॅरालीसिसचा झटका, शेवटचे दिवस गेले अत्यंत वाईट

मुंबई | गेल्या अनेक दिवसांपासून अभिनय क्षेत्रातील अनेक दिग्गज मान्यवर जगाचा निरोप घेत आहेत. त्यामुळे अभिनय क्षेत्राला कोणाची नजर तर लागली नाही ना? असा सवाल व्यक्त केला जात आहे. गेल्या दोन वर्षाच्या कालावधीत अनेक दिग्गजांनी प्राणज्योत मावळली आहे.
आत्ता अशीच एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. एका दिग्गज अभिनेत्रीने जगाचा निरोप घेतला आहे. वयाच्या ४७व्या वर्षी अभिनेत्रीने जगाचा निरोप घेतला आहे. रविवारी या अभिनेत्रीची प्राणज्योत मावळली आहे. अनेक मालिका आणि चित्रपटांमध्ये काम करून काही काळ अभिनय क्षेत्रात वजन असणारी अभिनेत्री म्हणून त्यांची ओळख होती.
इश्कबाज या मालिकेतून घराघरात पोहचलेली अभिनेत्री निशी सिंग भादली यांचे निधन झाले आहे. त्यामुळे अभिनय क्षेत्रात शोककळा पसरली आहे. त्यांनी अनेक चित्रपट आणि मालिकांमध्ये भूमिका साकारली होती. मात्र काही कालावधीत त्यांच्यावर खूप वाईट वेळ आली.
त्यांना पहिला अर्धायुंग झटका आला, त्यानंतर दुसरा आला आणि त्यानंतर तिसरा झटका देखील येऊन गेला होता. त्यामुळे त्या बेडवर खेळून होत्या. शनिवारी त्यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र रविवारी त्यांनी ३ वाजता अखेरचा श्वास घेतला.
त्यांचे पती अभिनेते संजय यांनी याबाबत माहिती दिली आहे. काही दिवसांपूर्वी सदर अभिनेत्रीच्या उपचारासाठी पैसे नव्हते. त्यामुळे पैशाची मदत संजय यांनी मागितली होती. मात्र दिवसेंदिवस त्यांची प्रकृती बिकट होत गेली आणि अखेर त्यांनी जगाचा निरोप घेतला आहे. त्यांच्या निधनाने पूर्ण अभिनय क्षेत्रात शोककळा पसरली आहे.