ऋषी कपूर यांची पत्नी दिसते खूप सुंदर; करते हे काम

मुंबई | दिवंगत अभिनेते ऋषी कपूर यांनी ८० ते ९० च्या दशकात अनेक सुपरहिट चित्रपट केले. त्यांच्या अभियनयाचा डंका संपूर्ण देशभर पसरला होता. बॉबी हा त्यांचा पहिला चित्रपट होता. पहिल्याच चित्रपटातून त्यांनी यशाला गवसणी घातली होती. त्यानंतर आपल्या अभिनयाच्या कारकिर्दीत त्यांनी मागे वळून पाहिलेच नाही. अशात ऋषी यांचा अभिनय आणि त्यांची कारकीर्द आपल्या सर्वांना माहीतच आहे. मात्र त्यांची पत्नी नीतू कपूर यांच्या अभिनयातील कारकिर्दी विषयी आज जाणून घेऊ.
नीतू सिंग यांनी बाल अभिनेत्री म्हणून 1966 मध्ये राजेंद्र कुमार आणि वैजयंतीमाला अभिनीत सूरज चित्रपटाद्वारे पदार्पण केले . बाल अभिनेत्री म्हणून त्यांचा सर्वात लोकप्रिय चित्रपट ‘ दो कलियां’ हा आहे. त्यानंतर मुख्य अभिनेत्री म्हणून त्यांचा पहिला चित्रपट 1973 चा रिक्षावाला हा होता.
या चित्रपटामध्ये त्यांच्या बरोबर ऋषी कपूर मुख्य भूमिका साकारत होते. मात्र या दोघांचा हा पहिलाच चित्रपट फ्लॉप ठरला. “लेकर हम दिवान दिल” या गाण्यातील त्यांच्या अभिनयाने त्यांना लोकप्रियता मिळवून दिली. बहुतेक चित्रपटांमध्ये, नीतूयांना सर्वात प्रेमळ मुलगी किंवा “आशावादी” मैत्रीण म्हणून चित्रित केले गेले.
याच दरम्यान त्या ऋषी कपूर यांना डेट करत होत्या. नीतू यांनी प्रियकर आणि पती ऋषी कपूर यांच्यासोबत 12 चित्रपटांमध्ये एकत्र काम केले. ज्यात खेल खेल में (1975), रफू चक्कर (1975), कभी कभी (1976), अमर अकबर अँथनी (1977), दुनिया मेरी जेब या चित्रपटांमध्ये नीतू पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत होत्या.
पति पत्नी और वो हा चित्रपट खूप यशस्वी ठरला होता. याच बरोबर त्यांनी झेहरीला इंसान (1974), जिंदा दिल (1975), दूसरा आदमी (1977), अंजाने आने (1978), झूठा कहें का (1979) आणि धन दौलत (1980) या चित्रपटात एकत्र काम केले आणि हे चित्रपट बॉक्स ऑफिसवर अपयशी ठरले.
नीतू तरुण असताना दिसायला देखील खूप सुंदर होत्या. मात्र ऋषी कपूर यांच्या कुटुंबात स्त्रियांना अभियनयाची मुभा नव्हती. साल १९८० मध्येच या दोघांनी लग्न केले होते. लग्ननंतर नीतू यांनी त्यांच्याकडे असलेले सगळे चित्रपट नाकारले. विशेष म्हणजे ऋषी यांच्या प्रेमाखातर त्यांनी चित्रपटाचे मिळालेले ॲडव्हान्स पैसे देखील परत केले होते. सध्या नीतू कपूर या आजी होणार असल्याने खूप खुश आहेत.