KGF चित्रपटातील प्रसिध्द अभिनेत्याची प्रकृती चिंताजनक; रुग्णालयात मृत्यूशी देतोय झुंज

दिल्ली | केजीएफ हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर मोठा विक्रम केला. त्यानंतर केजीएफ चाप्टर 2 हा चित्रपट देखील दिग्दर्शकांनी प्रेक्षकांच्या भेटीला आणला. या चित्रपटाने तर 1000 कोटींच्या पलीकडे जाऊन जबरदस्त विक्रम बॉक्स ऑफिसवर नोंदवला. या चित्रपटाच्या दोन्ही स्टोऱ्या प्रचंड गाजल्या.

 

लवकरच याचा तिसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. त्यामुळे सर्वच जण या चित्रपटासाठी आणखीन उत्सुक आहेत. मिळालेल्या माहितीनुसार सध्या या चित्रपटाच्या स्क्रिप्ट रायटिंगचे काम सुरू झाले आहे. केजीएफ 3 मध्ये देखील प्रचंड सस्पेन्स आणि ॲक्शन सीन पाहता येणार आहेत.

Advertisement

 

एकीकडे या चित्रपटाचे नवनवीन भाग प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. तर दुसरीकडे या चित्रपटातील एका कलाकाराच्या जीवनात दुःख पसरले आहे. कलाकार त्याच्या एका आजारामुळे मृत्यूची झुंज देत आहे. तसेच त्याने त्याच्या इतर मित्र परिवारातील कलाकारांकडे पैशांची मदत देखील मागितली आहे. कारण सदर अभिनेत्याला कर्करोगासारख्या विषाणूची लागण झाली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून तो या आजाराची झुंज देत आहे. मात्र आता त्याने स्वतः या गोष्टीचा खुलासा केला आहे.

Advertisement

 

केजीएफ आणि केजीएफ चाप्टर 2 या दोन्ही चित्रपटांमध्ये रॉकीचे काका खासीम चाचा यांची भूमिका अभिनेते हरीश रॉय दमदार पद्धतीने साकारताना दिसले. समोर आलेली धक्कादायक अपडेट ही हरीश यांच्या जीवनाशीच निगडित आहे. चित्रपटामध्ये काम करत असताना देखील त्यांना कर्करोगामुळे भरपूर त्रास होत होता. मात्र जर तुम्ही चित्रपट पाहिला असेल तर तुम्हाला वाटेल की हे सर्व खोटं आहे. कारण चित्रपटात हरीश हे अतिशय दमदार अभिनय करताना दिसले. असे असले तरी त्यांनी आपल्या आजाराबाबत स्वतः खुलासा केला आहे.

 

काही दिवसांपूर्वी त्यांनी एका माध्यमाला मुलाखत दिली होती. या मुलाखतीमध्ये त्यांनी स्पष्ट केले की, ” मी कर्करोगाच्या चौथ्या स्टेजवर आलो आहे. चित्रपटामध्ये काम करत असताना मला असंख्य वेदना होत होत्या. यावेळी माझ्या चेहऱ्यावर भरपूर सूज यायची. त्यामुळेच मी चेहऱ्यावरती भरपूर दाढी वाढवली होती.

 

दाढी वाढवलेला लूक प्रेक्षकांना देखील आवडला तसेच मला माझा आजार लपवण्यात मदत झाली. मात्र मी हे आता फार काळ लपवून ठेवू शकत नाही. कारण उपचार न घेतल्यास माझ्या जीवाला धोका आहे. मी बरेच दिवस पैशांसाठी हा चित्रपट प्रदर्शित होण्याची प्रतीक्षा केली. ”

 

मुलाखतीमध्ये पुढे त्यांना त्यांनी हे सत्य लपवून का ठेवले याविषयी देखील विचारले गेले. त्यावेळी त्यांनी भाऊक करणारे उत्तर दिले. ते म्हणाले की, ” मला या आजारासाठी भरपूर पैशांची गरज आहे. तीन लाखापेक्षाही जास्त खर्च मला दर महिन्याला करावा लागणार आहे.

 

मात्र एवढे पैसे माझ्याकडे नव्हते. जर मी याची आधीच माहिती दिली असती तर मला चित्रपटांमध्ये काम मिळणे मुश्किल झाले असते. तसेच माझ्या हातामध्ये जी कामे आहेत ती सुद्धा काढून घेतली गेली असती. त्यामुळे प्रचंड वेदना होत असून देखील मी त्या चेहऱ्यावर न दाखवता अभिनय करत राहिलो.”

 

हरीश यांनी त्यांच्या स्वतःच्या फेसबुक अकाउंटवर देखील व्हिडिओ पोस्ट केला आहे. या व्हिडिओमध्ये देखील त्यांनी आपल्या आजाराविषयी माहिती दिली आहे. तसेच पैशांची गरज असल्याने मदतीचा हात पुढे करावा असे देखील ते यात म्हणाले आहेत. आजवर हरीश रॉय यांनी बेंगलोर अंडरवर्ल्ड, जोडी हक्की, ओम, बेली डॉन, और एक दिलजला, संजू विड्स गीथा, जन्मदाता, राजबहादुर, द प्लॅन अशा अनेक चित्रपटांमध्ये त्यांनी अभिनय केला आहे.

 

हरीश एक विनोदी अभिनेते आहेत. त्यांनी जास्त करून चित्रपटांमध्ये सहाय्यक विनोदी कलाकाराची भूमिका साकारली आहे. असे असले तरी त्यांचा चाहता वर्ग प्रचंड मोठा आहे. त्यांच्या तब्येती विषयी मिळालेल्या अपडेटमुळे सर्वजण भांबावले आहेत. तसेच त्यांना लवकरात लवकर बरे वाटावे यासाठी जमेल तशी मदत करत आहेत.

पूर्ण बातमी वाचा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *