…यामुळे धोनीने आपल्या हेल्मेट वरून हटवला तिरंगा
मुंबई | भारताला स्वातंत्र्य होऊन 75 वर्ष पूर्ण झाली आहेत. या निमित्ताने आज संपूर्ण भारतभर 75 वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी हर घर तिरंगा ही मोहीम राबवली. यामध्ये अनेक कलाकार तसेच खेळाडूंनी देखील सहभाग घेतला होता. मोठमोठ्या दिग्गज व्यक्तींबरोबरच सर्वसामान्य नागरिकांनी देखील यामध्ये सहभाग घेतला.
यावेळी अनेक खेळाडूंनी आपल्या घरावर तिरंगा लावला. आजादी का अमृत महोत्सव या अंतर्गत हा उपक्रम राबवला जात होता. यामध्ये प्रत्येक व्यक्तीने आपल्या घरावर आपल्या देशाची शान असलेला राष्ट्रध्वज फडकवायचा होता. त्यामुळे अनेक खेळाडूंनी सोशल मीडियावर त्यांचे प्रोफाइल फोटो बदलून तिथे तिरंगा लावला. त्याचबरोबर घराघरात देखील तिरंगा फडकला.
अनेक खेळाडू हे आपल्या हेल्मेटवर राष्ट्रध्वजाची प्रतिमा लावताना दिसतात. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने याची सुरुवात केली. तो प्रत्येक खेळामध्ये आपल्या हेल्मेट वर तिरंगा लावायचा. त्याचे पाहून नंतर अनेक खेळाडूंनी असे करण्यास सुरुवात केली. सध्या विराट कोहली पासून श्रेयस अय्यर आणि रोहित शर्मा पर्यंत सर्वच खेळाडू आपल्या हेल्मेट वर तीरंगा लावत आहेत.
सचिनने जेव्हा याची सुरुवात केली होती तेव्हा वीरेंद्र सेहवाग आणि सौरव गांगुली यांनी देखील आपल्या हेल्मेट वर तिरंग्याची प्रतिकृती लावली होती. एम एस धोनी हा देखील त्याच्या हेल्मेट वर तिरंग्याची प्रतिकृती लावायचा. यावेळी असे केल्याने खेळायला आणखीन ऊर्जा मिळते असे सर्व खेळाडूंचे म्हणणे होते.
मात्र काही दिवसांनी धोनीने हेल्मेटवर तिरंगा लावणे बंद केले. यावेळी अनेकांनी त्याला वेगवेगळे प्रश्न विचारले. यावेळी एका माध्यमाला दिलेल्या मुलाखतीत त्याने सांगितले होते की, ” मी नेहमीच फक्त फलंदाजी करत नाही मला कधीकधी यश्टीरक्षक देखील व्हावे लागते.
यावेळी अनेकदा हेल्मेट जमिनीवर ठेवले जाते यामुळे आपल्या देशाच्या राष्ट्रध्वजाचा अवमान होतो असे मला वाटते. त्यामुळे मी तिरंगा हेल्मेट वर न लावण्याचा निर्णय घेतला आहे. साल 2019 मध्ये एका सामन्या दरम्यान धोनीने टेरिटोरियल आर्मीचा बलिदान बॅच आपल्या हेल्मेटवर लावला होता. यावेळी अनेकांनी त्याचे कौतुक केले होते. मात्र बऱ्याच व्यक्तींनी त्याच्यावर टीका देखील केली होती.