फॉरेनची पाटलीन चित्रपटातील अभिनेत्री आठवतेय का? सध्या करतेय हे काम; झालीय अशी अवस्था

मुंबई | मराठी चित्रपट सृष्टीत  (Marathi Film industry) अनेक दिग्गज कलाकार आले आणि त्यांनी काही काळ गजविला तर काही फक्त एखाद्या चित्रपटासाठी मर्यादित राहिले. आणि नंतर ते गायब झाले. असे अनेक किस्से आहेत. ज्यात अभिनेता किंवा अभिनेत्री चांगलीच चर्चेत येते आणि त्यानंतर ती अभिनया पासून पूर्णपणे लांब जाते. त्यावेळी त्यांच्या चाहत्यांना ते नेमके काय करतात हे जाणून घेण्याची उत्सुकता असते.

Join WhatsApp Group

काही वर्षांपूर्वी फॉरेनची पाटलीन (Foreignchi patlin) हा मराठी चित्रपट आला होता.  या चित्रपटाचे मराठी रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवले होते. मुलगा शिक्षणासाठी देश सोडून बाहेर जातो. आणि जेव्हा तो शिक्षण घेऊन परत येतो तेव्हा सोबत येताना एक बाहेरील देशातील मुलगी घेऊन येतो. आणि तिच्या सोबत तो संसार थाटतो. सुरुवातीला शेतातील कामे करण्यासाठी त्या मुलीला फार त्रास सहन करावा लागतो.

त्यामुळे घरातील बाकी लोकांना ती पटत नाही. मात्र आधुनिक technology वापरून फॉरेन हून आलेली सूनबाई खूप चांगला संसार करते. आणि गावात चांगली इमेज निर्माण करते. अशी स्टोरी या चित्रपटात दाखविण्यात आली आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील लोकांना हा चित्रपट फारच आवडला होता. या चित्रपटात मुख्य भूमिकेत राष्ट्रीयत्व भारतीय असणारी बिलजाना रॅडोनिक (Biljana Radonic) या अभिनेत्रीने काम पाहिले आहे.

तर गिरीश परदेशी (Girish Pardesi), विजय आपटे (Vinay Apate), सुरेखा कुडाची (Surekha kudachi), संजय मोहिते  (Sanjay Mohite) या मराठी कलाकारांनी तिला सहकार्य केले आहे. मात्र हा चित्रपट प्रसिध्द झाल्यानंतर बिलजना गायब झाल्याने तिच्या चाहत्यांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे. त्यानंतर ती कोणत्याच चित्रपटात झळकली नाही. त्यामुळे ती सध्या कुठे आहे आणि काय करतेय? असा प्रश्न पडला आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहिती नुसार बिलजाना रॅडोनिक ही सध्या लंडन मध्ये वास्तव्यास आहे. तसेच तिने काही दिवसांपुर्वी एक व्यवसाय सुरू केला होता. आणि तो कोणत्या तरी मोठ्या कंपनीत नोकरी देखील करत असल्याची माहिती समोर आली आहे. मात्र अभिनय क्षेत्रा पासून ती पूर्णपणे लांब गेली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button