पछाडलेला चित्रपटातील दुर्गा मावशी आठवतात का? सध्या करतात हे काम

मुंबई | मराठी सिनेसृष्टीतील दिग्गज अभिनेत्री वंदना गुप्ते या १६ जुलै रोजी त्यांचा वाढदिवस साजरा करतात. पछाडलेला या चित्रपटात त्यांचा धमाकेदार अभिनय आपल्याला पाहायला मिळाला. मराठी सिनेसृष्टीत त्यांनी आत्तापर्यंत अनेक मालिका आणि चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या आयुष्यातील काही खास गोष्टी जाणून घेऊ.

 

वंदना गुप्ते यांचा जन्म 16 जुलै 1952 रोजी झाला. त्यांनी आज वयाची सत्तरी गाठली आहे. त्यांनी त्यांच्या कारकीर्दीत अनेक नाटके सिनेमे तसेच मालिकांमध्ये काम केले आहे. पछाडलेला, फॅमिली कट्टा, फोटोकॉपी, 66 सदाशिव, वेल डन बेबी, डबल सिट, मातीच्या चुली, बे दुणे साडे चार, टाईनप्लीज, मर्डर मेस्त्री, बकेट लिस्ट, आंधळी कोशिंबीर, व्हॉट्सअप लग्न हे प्रयोग त्यांनी गाजवले.

 

अखेरचा सवाल, आणि काही, ओली पाने, गगनभेदी, चारचौघी, चार दिवस प्रेमाचे, चार दिन प्यार के (हिंदी), झुंज, पद्मश्री धुंडिराज, प्रेमा तुझ्या गावा जावे, मदनबाधा, रंग उमलले मनाचे, रमले मी,, वाडा चिरेबंदी, शूऽऽ कुठं, बोलायचं नाही, श्री तशी सौ, संध्याछाया, सातव्या मुलीची, सातवी मुलगी, सुंदर मी होणार, सेलिब्रेशन, सोनचाफा, हरवलेल्या पत्त्यांचा बंगला ही त्यांनी केलेली नाटके आहेत.

 

त्यांच्या कारिर्दीत त्यांनी आंधळी कोशिंबीर (२०१४),टाईम प्लीज (२०१३), दिवसेंदिवस (२००६), पछाडलेला (२००४) बाप रे बाप डोक्याला ताप (२००८), बे दुणे साडेचार (२००९), मणी मंगळसूत्र (२०१०), मातीच्या चुली (२००६) मीराबाई नॉट आऊट (हिंदी – २००८), लपंडाव (१९९३)

 

समांतर (२००९) या चित्रपटात कामे केली. बेळगावात झालेल्या ९५व्या अखिल भारतीय नाट्यसंमेलनाच्या उद्‌घाटन कार्यक्रमात गोगटे फाउंडेशनच्या वतीने वंदना गुप्ते यांना जीवनगौरव पुरस्कार देण्यात आला होता. त्याच्या आई माणिक वर्मा या एक मोठ्या गायिका होत्या. वंदना गुप्ते आणि भारती आचरेकर या दोन्ही हिंदी आणि मराठी सिनेसृष्टीतील दिग्गज बहिणी म्हणून ओळखल्या जातात.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button