न्यूयॉर्कमध्ये दिवाळीच्या सुट्टया ; अभिनेत्री प्रियंका चोप्रान व्यक्त केलं मत…

न्यूयॉर्क| शहरातील सार्वजनिक शाळांना दिवाळीची सुट्टी देण्यात येईल. महापौर एरिक अँडम्स म्हणाले की यामुळे शहराच्या समानतेचा संदेश जातो. तसेच न्युयॉर्क शहरात मुळ भारतीय वंशाच्या असणाऱ्यांची संख्या मोठी आहे. त्यामुळे न्युयॉर्क शहरातही मोठ्या प्रमाणात दिवाळी साजरी केली जाते. म्हणून एवढ्या वर्षांनंतर न्यूयॉर्कच्या शाळांना दिवाळी निमित्त सुट्टी देण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे.
तसेच दिवाळीची सुट्टी देणं म्हणजे न्यूयॉर्क मधील नव्या पिढीला दिवाळ सण काय आणि तो साजरा कसा केला जातो हे देखील शिकता येईल. भारतीय-अमेरिकन समुदायाची ही प्रलंबित मागणी होती. तरी न्यूयॉर्कच्या या मोठ्या निर्णयामुळे भारतीय सण, संस्कृती, परंपरा, वारसा ह्याची चर्चा जगभरात होत आहे. तरी भारतीय अभिनेत्री आणि अमेरीकेची सुन प्रियंका चोप्राने यावर आपली प्रतिक्रीया दिली आहे.
तिनं अधिकृत इंस्टाग्राम पेजवर यासंबंधीत स्टोरी शेअर केली आहे. ज्यात तिने आपल्या बालपणीच्या आठवणींना उजाळा दिला आहे. प्रियांका वयाच्या 13 व्या वर्षी शिक्षणासाठी अमेरिकेत गेली. ती तिच्या मावशीसोबत राहत होती आणि क्वीन्स, न्यूयॉर्क नंतर न्यूटन, मॅसॅच्युसेट्स आणि आयोवा येथील सीडर रॅपिड्स येथील शाळांमध्ये शिकली. तेव्हा प्रियंका दरवर्षी भारताच्या दिवाळ सणाला मिस करायची.
2023 मध्ये अमेरिकेत दिवाळीची सुट्टी:
पुढील वर्षांपासून म्हणजे 2023 मध्ये न्यूयॉर्क शहरातील सर्व शासकीय शाळांना दिवाळीची सुट्टी असणार आहे. महापौर एरिक एडम्स यांनी सांगितले की, भारतीय-अमेरिकन समुदायाकडून दिवाळीच्या सुट्टीची मागणी केली जात होती. त्या मागणीचा सकारात्मकपणे विचार करण्यात आला आहे. यामुळे आता भारतीयांच्या या सणाचे महत्त्व अमेरिकन विद्यार्थ्यांनादेखील समजणार असल्याचे त्यांनी म्हटले.