Diesel Pump Anudan Yojana: सरकार देणार डिझेल पंप खरेदीवर 75 टक्के अनुदान; लगेच करा अर्ज

Disel Pump Anudan Yojana | नमस्कार शेतकरी मित्रांनो भारत सरकार हे आपल्या देशातील जनतेसाठी वेगवेगळ्या प्रकारच्या योजना नेहमी आणत असते. अशाच योजनेपैकी आपण आज एका नवीन योजनेची माहिती घेणार आहोत. या योजनेअतर्गत शेतकऱ्यांना डिझेल पंप खरेदी करण्यासाठी ७५% अनुदान हे सरकार देणार आहे. महाराष्ट्र शासनाकडून हे अनुदान जे शेतकरी डिझेल पंप खरेदी करणार आहे त्यांना दिले जाणार आहे. याची सविस्तर माहिती आपण घेणार आहोत.

 

या योजनेसाठी महाराष्ट्रातील सर्व शेतकरी पात्र असणार आहेत. या योजनेसाठी इतर राज्यातील नागरिक अर्ज करू शकणार नाहीत. फक्त महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी ही योजना लागू आहे. शेतकऱ्यांना डिझेल पंप खरेदी करण्यासाठी या योजनेमधून ७५% अनुदान मिळत आहे. महाराष्ट्रातील काही गावांसाठीच ही योजना चालू झालेली आहे. हळू हळू या योजनेचा राज्यभर विस्तार वाढत चालला आहे. (Diesel Pump Anudan Yojana)

Advertisement

 

या योजनेसाठी लागणारी कागदपत्रे (documents list) –

Advertisement
   • आधारकार्ड
   • बँक पासबुक
   • शेतीचा उतारा
   • ७/१२
   • ८अ
   • ईमेल आयडी
   • मोबाईल नंबर
   • जातीचा दाखला
   • अपंग असल्यास प्रमाणपत्र

 

या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्रता –

  • लाभार्थी हा महाराष्ट्रातील रहिवासी असावा.
  • या पूर्वी लाभार्थ्यांनी हा लाभ घेतलेला नसावा.
  • लाभार्थ्याला अगोदर विहिर किंवा बोर असणे आवश्यक आहे. आणि त्याची नोंद ही उताऱ्यावर असायला हवी.
  • लाभार्थ्यांनी खरेदी केलेला डिझेल पंप यांबद्दल माहिती असणे आवश्यक आहे.
  • आपल्या जवळच्या कॉमन सर्व्हिस सेंटरमध्ये जाऊन देखील अर्ज करू शकता.

 

येथे क्लिक करुन करा ऑनलाईन अर्ज –

https://dbt.mahapocra.gov.in/Office/Registration/IndividualRegistrationNew.aspx

पूर्ण बातमी वाचा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *