अल्ताफ शेख दिग्दर्शित धारावी कट्टा चित्रपटाला पुरस्कार जाहीर; चित्रपटाच्या पोस्टरने सोशल मीडियावर घातला धुमाकूळ

सोलापूर | नुकताच भारताचा 75 वा स्वातंत्र्य दिवस मोठ्या दिमाखात साजरा करण्यात आला. यावेळी वेगवेगळ्या ठिकाणी 75 व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त अमृत महोत्सव साजरा करत वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. इंदिरा कल्याण केंद्र खडकीच्या वतीने देखील 75 वा स्वातंत्र्य दिन दिमाखात साजरा झाला. वेगवेगळ्या उपक्रमांचे आयोजन करण्यात आले.

 

तसेच अल्ताफ शेख दिग्दर्शित धारावी कट्टा या हिंदी चित्रपटाला मिळालेल्या पुरस्कारासाठी सर्वांचे विशेष कौतुक करण्यात आले. याप्रसंगी कारगिल युद्धातील शूर सैनिक कमांडो जगदीश चंद्रा देसले आणि सिद्धार्थ शिरोळे या आमदारांच्या शुभहस्ते सर्वप्रथम ध्वजारोहण करण्यात आले. स्वातंत्र्य दिनाच्या या उत्सवात अनेक मान्यवर उपस्थित राहिले होते.

Advertisement

 

यामध्ये खडकी छावणी परिषदेचे उपाध्षक्ष मा.दुर्योधन भापकर तसेच माजी उपाध्यक्ष मा. मनिष आनंद, माजी नगरसेवक श्री तुषार गांधी, मा. अजिझ नवाज शेख, मा.रामजी कुमार ( सी.बी.आय अधिकारी ) मा.धर्मेश शहा, मा.राज खतिब ( ए.सी.पी मुंबई ) डी.ओ.पी कुमार डोंगरे, मा.बाळासाहेब आहेर, अभिनेता महादेव शिरोडकर तसेच श्री हाजी हुसेन कुरेशी यांची विशेष उपस्थिती होती.

Advertisement

 

सदर कार्यक्रमात अल्ताफ शेख दिग्दर्शित धारावी कट्टा या चित्रपटाचे देखील प्रमोशन केले गेले. लवकरच हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. प्रमोशनदरम्यान उपस्थित व्यक्तींनी चित्रपटाच्या संपूर्ण टीमला उत्स्फूर्त प्रतिसाद दाखवला. तसेच चाहते आता चित्रपट प्रदर्शित होण्याची प्रतीक्षा करत आहेत. सदर चित्रपटाचे पोस्टर सोशल मीडियावर शेअर करण्यात आले आहे.

 

सध्या या चित्रपटाची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे. २०१४ साली अल्ताफ शेख यांचा डब्लू हा चित्रपट रिलीज झाला होता. तसेच २०१८ साली वेडा बीएफ या चित्रपटाने तर बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला होता. आता दिग्दर्शक शेख यांचे बेतुका, कमॉन विष्णू आणि धारावी कट्टा हे चित्रपट भेटीला येणार आहेत.

 

यावेळी चित्रपटाच्या टीम मधील अभिनेत्री मुस्कान शेख, प्लेबॅक सिंगर अर्पित कोमल, अभिनेता अभिषेक चवरे, अली शेख, अमजद खान, आरती पाटील, कोरोग्राफर रियाज शेख, कॉस्च्युम डिझायनर संगीता चवरे, लाईन प्रोडूसर शहाजहान शेख, खलनायक नबी शेख, शेख सलमान शेख आणि किरण घोडके,स्वरूप वेदक, मेकअप शैला पाटील

 

अफजल इस्माईल खान (संपादक पोलीस रक्षक न्यूज), इंदिरा कल्याण केंद्राचे अध्पक्ष मा.हाजी समीर चौधरी, पत्रकार कलिंदर शेख, आफताब कलिंदर शेख (निर्भिड पत्रकार न्यूज), असिफ पिरजादे, महेबुब पिरजादे, जहीर शेख, अजहर खान, जफर चौधरी, शहानवाज कुरेशी, फिरोज शेख, हारून सय्यद, जूनैद चौधरी, मा.रमजान ज्पूनिअर अमिताभ बच्चन, रिजवान शेख ,अयाज कुरेशी, सईद शेख

 

सोहेल कुरेशी, यूसुफ शेख, मगदुम खान, गणेश कांबळे, मूर्तुझा शेख,जाकीर शेख, सलिम कुरेशी, विजय गायकवाड, मुख्तार कुरेशी, फिरोज खान, महेबूब शेख, रवि गायकवाड ,अनिल जाधव , अनिल सोनवणे, जादुगार मा.शामकुमार इत्यादी कलाकार मंडळींनी हजेरी लावली होती.

पूर्ण बातमी वाचा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *