धर्मवीर 2 चित्रपटाच्या शुटींगला सुरुवात? लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला

मुंबई | गेल्या काही दिवसांपूर्वी धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगलीच छाप पाडून गेला आहे. या चित्रपटात आनंद दिघे यांची भूमिका प्रसाद ओक याने साकारली आहे. या भूमिकेमुळे तो मराठी रसिकांच्या मनावर अधिराज्य करू लागला आहे. या चित्रपटाचे निर्मिती मंगेश देसाई यांनी केली आहे.
तर या चित्रपटाचे दिग्दर्शन अभिनेते प्रवीण तरडे यांनी केले आहे. त्यांचा यापूर्वी मुळशी पॅटर्न हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालून गेला होता. त्यानंतर धर्मवीर – मुक्काम पोस्ट ठाणे या चित्रपटाने तर अनेक रसिकांच्या मनावर राज्य केलं आहे. स्वर्गीय शिवसेना नेते आनंद दिघे यांच्या आयुष्यावर हा चित्रपट काढण्यात आला आहे.
आनंद दिघे यांनी त्यांच्या कारकिर्दीत केलेल्या अनेक कामांचा सलोखा या चित्रपटाच्या माध्यमातून मांडण्यात आला आहे. या चित्रपटाच्या निर्मिती नंतर राज्याच्या राजकारणात मोठे बदल देखील झालेले पाहायला मिळाले आहेत. मात्र या चित्रपटाच्या चाहत्यांसाठी आणखी एक आनंदाची बातमी समोर आली आहे.
याची प्रसाद ओक याने एक हींट दिली आहे. धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे या चित्रपटाचा दुसरा भाग लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याची माहिती समोर येत आहे. आनंद दिघे यांना हृदयविकाराचां झटका येतो आणि त्यानंतर हा चित्रपट संपतो असे दिसत आहे. मात्र धर्मवीर 2 मध्ये पुढील भाग दाखविण्यात येणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
प्रकाश ओक याने एक इंस्टाग्राम पोस्ट लिहली आहे. त्यात त्याने या चित्रपटाचा पुढील भाग प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याची एक हिंट दिली आहे. दिग्दर्शक प्रवीण तरडे यांचा जन्म दिवस होता. यावेळी त्यांना शुभेच्छा पोस्ट लिहिताना प्रसाद म्हणाला की, “वाढदिवसाच्या अनंत कोटी शुभेच्छा! माझ्या मुळे तुझ्या चेहऱ्यावर आलेल्या या प्रसन्न हास्य कायम ठेवण्याचा प्रयत्न मी धर्मवीर च्या पुढील भागातही करेल अशी मी खात्री देतो.”
अशी पोस्ट त्याने लिहली आहे. त्यामुळे लवकरच धर्मवीर चित्रपटाचा पुढील भाग प्रेक्षकांच्या भेटीला येईल अशी इच्छा व्यक्त केली जात आहे. पुढील भागात देखील प्रसाद ओक याला मुख्य भूमिका दिली जाऊ शकते. मात्र धर्मवीर चित्रपटात दिघे साहेबांचे निधन दाखविण्यात आले आहे. त्यामुळे पुढील भागात प्रसाद याला कोणती भूमिका मिळणार हे पाहणं देखील महत्वाचं ठरणार आहे.