राजू श्रीवास्तव यांची प्रकृती अधिकच चिंताजनक; डॉक्टर म्हणाले कोणत्याही क्षणी…
दिल्ली | गेल्या काही दिवसांपासून विनोदी अभिनेते राजु श्रीवास्तव यांची प्रकृती अधिकच चिंताजनक बनली आहे. त्यांना दिल्ली मधील एम्स रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मात्र त्यांच्या प्रकृतीत अद्याप थोडी देखील सुधारणा आली नाही.
त्यामुळे त्यांच्या चाहत्यांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी त्यांच्या मेंदूच्या काही चाचण्या करण्यात आल्या होत्या. मात्र त्यात त्यांचा मेंदू काम करत नसल्याचे डॉक्टरांना दिसून आले होते. त्यामुळे देखील भीतीदायक वातावरण निर्माण झाले होते.
सध्या त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे. मात्र त्यांना शुद्ध आली नाही. काही दिवसांपूर्वी त्यांनी हालचाल केली होती. काही मात्र त्यानंतर त्यांना शुद्ध येईल असे डॉक्टरांना वाटले होते. मात्र तरीही ते शुध्दीवर आले नाहीत. त्यामुळे त्यांच्या चाहत्यांना धक्क्यावर धक्के बसले आहेत.
सध्या आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. राजू यांची प्रकृती आणखी बिघडली आहे. त्यांचे हृदय कमी काम करत असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे त्यांच्या प्रकृतीत आणखी बिघाड झाला आहे. अनेक दिग्गज डॉक्टर त्यांच्यावर उपचार करत आहेत.
त्यांच्या नातेवाईकांना देखील दिल्ली मध्ये आणण्यात येत आहे. तसेच डॉक्टर देखील त्यांच्या प्रकृती बाबत काही बोलत नाहीत. त्यामुळे राजू यांचं पुढे काय होणार? असा प्रश्न सर्वांना पडला आहे. लाखो करोडो चाहते देवाकडे त्यांचे आरोग्य सुधारण्यासाठी देवाकडे प्रार्थना करत आहेत.