बॉलीवूड हादरलं! आणखी एका दिग्गज अभिनेत्रीचे निधन; २००हून अधिक चित्रपटात साकारली होती भूमिका

दिल्ली | गेल्या दोन ते तीन वर्षापासून अनेक दिग्गज कलाकार जगाचा निरोप घेत आहेत. यात हॉलिवुड आणि बॉलिवूड या दोन्हीचा समावेश आहे. भारतीय चित्रपट सृष्टीतील अनेक दिग्गजांनी जगाचा निरोप घेतल्याने अभिनय क्षेत्रात एक पोकळी निर्माण झाली आहे.
त्यामुळे ही पोकळी कधी भरून निघणार? असा प्रश्न देखील सर्वांना पडला आहे. लता मंगेशकर यांच्या सारख्या दिग्गज गायकांनी देखील जगाचा निरोप घेतला आहे. त्यांच्या निधनाने भारत सोडून इतर देशांमध्ये देखील शोक व्यक्त करण्यात आला होता.
एवढंच नव्हे तर पाकिस्तान मध्ये देखील त्यांच्या निधनाने मोठी श्रद्धांजली अर्पण करण्यात आली होती. लता दीदी यांच्या नंतर अनेक दिग्गज देखील जगाला सोडून गेले आहेत. यात रमेश देव, बप्पी लहरी, सिद्धू मुसेवाला, केके या सारखे दिग्गजांनी जगाचा निरोप घेतला आहे.
त्यामुळे अभिनय क्षेत्राला झालंय तरी काय? असा सवाल उपस्थित केला जात आहे. सध्या अशीच एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. २००हून अधिक चित्रपटात काम करून लाखो चाहत्यांच्या मनावर राज्य करणारी अभिनेत्री अंबिका रॉयने जगाचा निरोप घेतला आहे.
त्या मल्याळम आणि हिंदी चित्रपट सृष्टीत अधिक सक्रिय होत्या. त्यांनी अनेक चित्रपटात भूमिका साकारल्या, त्यांचे अनेक चित्रपटात चांगलेच हिट झाले आहेत. त्यांच्या निधनाने अभिनय क्षेत्रात शोककळा पसरली आहे.
त्यांना कोरोना झाला होता. त्यानतंर त्यांची प्रकृती बिघडली होती. आणि त्या आजारी पडल्या होत्या. त्यानतंर त्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र मृत्यू सोबतची त्यांची झुंज अखेर अपयशी ठरली आहे. अखेर त्यांनी जगाचा निरोप घेतला आहे.