WWE मधील प्रसिध्द खेळाडूचे निधन; खेळ विश्वात शोककळा

नवी दिल्ली: क्रीडा जगतासाठी एक दुख:द बातमी समोर आली आहे. वर्ल्ड रेसलिंग इंटरटेनमेंटमधील माजी रेसलर सारा ली हिचे निधन झाले आहे. सारा फक्त 30 वर्षाची होती. साराच्या निधनाचे वृत्त तिच्या आईने सोशल मीडियावरून दिले.

Join WhatsApp Group

 

WWE मध्ये सारा ली जवळपास एक वर्ष खेळली. ती 2016 मध्ये एका लाइव्ह इव्हेंटमध्ये हील प्रोमोमध्ये दिसली होती. त्यानंतर काही दिवसांनी जानेवारीत सारा लीने सिक्स वुमेन्स टॅग टीम मॅचमध्ये इन-रिंग पदार्पण केलं होतं. त्याचवेळी त्यात मॅंडी रोजनेही सहभाग घेतला होता.

 

 

सारा ली ही WWE च्या रिॲलिटी सीरीज टफ इनफच्या सहाव्या पर्वाची विजेती होती. 2016 च्या अखेरीस सारा लीने शेवटचा सामना खेळला होता. ऑगस्टमध्ये सारा ली दुहेरी लढत खेळली होती. लिव्ह मॉर्गन हा तिच्यासोबत होता. आलिया आणि बिली यांच्याशी त्यांचा सामना झाला होता.

 

 

सारा ली ही सोशल मीडिया सेन्सेशनही होती. तिचे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल होत असत. सारा लीने पाच वर्षांपूर्वी WWW चा माजी सुपरस्टार वेज्ली ब्लॅकसोबत लग्न केले होते.

 

चेल्सी यांचं ट्विट:
चेल्सी ग्रीननं सारा लीच्या कुटुंबाप्रती शोक व्यक्त केलाय. तिनं आपल्या ट्विटमध्ये लिहिलंय की, कोणतंही ट्विट किंवा शब्द या सुंदर माणसाला परत आणू शकत नाहीत. परंतु माझं संपूर्ण हृदय आणि वेस्टिन ब्लेक तिच्या कुटुंबियासाठी आहे. तिनं पुढं म्हटलंय की, सारा लीची खूप आठवण येईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button