क्रिकेटपटू रिषभ पंतच्या गाडीला भीषण अपघात; रुग्णालयात उपचार सुरू, प्रकृती गंभीर…

दिल्ली | आपल्या बॅटिंगने क्रिकेट विश्वावर अधिराज्य गाजविणाऱ्या रिषभ पंतचां मोठा अपघात झाला आहे. त्यामुळे त्याच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. रुडकी येथील नासरण बोर्डवर त्याचा भीषण अपघात झाला आहे. त्याला देखील यात गंभीर दुखापत झाली आहे.
त्याच्या डोक्याला देखील गंभीर मार बसला आहे. तसेच त्याचा पाय फ्रॅक्चर देखील झाला आहे. पाठीला देखील गंभिर मार लागला आहे. त्यामुळे त्याला लगेच रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घडले असे की तो अपघाताच्या वेळी गाडी चालवत होता.
त्याची गाडी कंट्रोलच्या बाहेर गेली आणि त्याचा हा अपघात झाला आहे. रेलिंगला जोरदार धडक लागल्याने हा भीषण अपघात झाला आहे. त्यामुळे त्याला सध्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. रिषभ पंत हा भारतीय क्रिकेट संघाचा एक युवा खेळाडू म्हणून ओळखला जातो. त्याचे करोडो चाहते आहेत. मात्र आज सकाळी सकाळी चाहत्यांना हा मोठा धक्का बसला आहे.