आत्ताच्या घडामोडी

लोकेश राहुलचे ठरलं लग्न; ‘या’ हॉट अभिनेत्रीच्या अडकला जाळ्यात

दिल्ली | लोकेश राहुल हा एक भारतीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू आहे. तो सध्याच्या भारतीय राष्ट्रीय क्रिकेट संघाचा सर्व फॉरमॅटमध्ये उपकर्णधार आहे. देशांतर्गत क्रिकेटमध्ये तो कर्नाटककडून खेळतो. तो इंडियन प्रीमियर लीगमधील लखनौ सुपर जायंट्सचा सध्याचा कर्णधार आहे. तो उजव्या हाताचा फलंदाज आणि अधूनमधून यष्टिरक्षक आहे.

 

राहुलने 2014 मध्ये आंतरराष्ट्रीय पदार्पण केले आणि त्याच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात पहिले कसोटी शतक झळकावले. पुरुषांच्या एकदिवसीय आंतरराष्ट्रीय पदार्पणात शतक झळकावणारा तो पहिला भारतीय होता, आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये शतक झळकावणारा तिसरा भारतीय होता.

 

के एल राहुल हा भारताच्या क्रिकेट संघाचा महत्वाचा खेळाडू आहे. तो भरताचा फलंदाज म्हणून चांगली भूमिका बजावत आहे. आणि आत्ता लखनऊ सुपर जाएंटसाठी सर्वात जास्त धावा करनारा फलंदाज ठरला आहे. आत्ता तो परत चर्चेत आला आहे. त्याचं कारण आहे त्याचं लग्न! या पूर्वी ही त्याचं नाव अनेक अभिनेत्री सोबत जोडल गेल होत, पण आत्ता तो एका हॉट आणि सुंदर अभिनेत्रीशी लग्न करनार आहे.

 

ती अभिनेत्री म्हनजे दूसरी तिसरी कोणी नसुन सुनील आणि माना शेट्टीची मुलगी अथिया शेट्टी आहे. अथिया शेट्टी ही एक भारतीय अभिनेत्री आहे जी हिंदी चित्रपटांमध्ये दिसते. तिने रोमँटिक अॅक्शन फिल्म हिरोमध्ये पदार्पण केले, ज्यासाठी तिला सर्वोत्कृष्ट महिला पदार्पणासाठी फिल्मफेअर पुरस्कार नामांकन मिळाले आहे.

 

सूत्रांच्या माहिती नूसार त्यांचा विवाह हा ‘हिवाळ्यात’ दक्षिण भारतीय पद्धतीने करण्याचे ठरले आहे. या विवाह सोहळ्याला अनेक दिग्गज उपस्थिती लावणार आहेत. लोकेश राहुल याला मानणारा वर्ग फार मोठा आहे. त्यांना ही बातमी समजल्यावर आश्चर्याचा धक्का बसला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button