आत्ताच्या घडामोडी

गौतम गंभीरची पत्नी दिसते खूपच सुंदर; करते हे काम

मुंबई | राजधानी दिल्लीत भाजपच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढवणारा माजी क्रिकेटपटू गौतम गंभीर वार्षिक कमाईच्या बाबतीत सर्वात श्रीमंत उमेदवार आहे, नामांकनादरम्यान दाखल करण्यात आलेल्या प्रतिज्ञापत्रात गौतम गंभीरचे वार्षिक उत्पन्न 12 कोटींहून अधिक असल्याचे दिसून आले आहे.

 

गौतम गंभीरची एकूण संपत्ती 147 कोटी आहे आणि त्याची पत्नी नताशा गंभीरने इन्कम टॅक्स रिटर्न भरताना तिचे वार्षिक उत्पन्न 6.15 लाख रुपये दाखवले आहे, गंभीरकडे 5 कार आणि एक बाईक आहे. आज या बातमीमधून त्याच्या पत्नी विषयी जाणून घेऊ.

 

गौतम गंभीरची पत्नी श्रीमती नताशा गंभीर या राजघराण्यातील आहेत. दिल्लीच्या करोडपती व्यापारी कुटुंबातील मुलगी नताशा जैन आणि गौतम गंभीर हे एकमेकांना खूप दिवसांपासून ओळखत होते, दोघांचे अरेंज्ड मॅरेज असल्याचं बोललं जात असलं तरी काही मीडिया सूत्रांनी या लग्नाला लव्ह मॅरेज म्हटलं आहे.

 

28 ऑक्टोबर 2011 रोजी गौतम आणि नताशाचे लग्न झाले, अनेकदा आयपीएल सामन्यांदरम्यान नताशा स्टेडियमच्या प्रेक्षक गॅलरीत दिसली. जरी ती क्रिकेटच्या व्यासपीठावर क्वचितच दिसली असली तरी नताशा जैन सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. तिचे सौंदर्य, तिचा ड्रेसिंग सेन्स आणि तिची साधी राहणी नेहमीच चर्चेत असते.

 

आपल्या वैयक्तिक आयुष्याबद्दल गौतम गंभीरने एका इव्हेंटमध्ये सांगितले होते की, त्याला डान्स येत नाही आणि नताशा अनेकदा त्याला डान्स करायला भाग पाडते. त्यामुळे मी एका एड मध्ये डान्स केला होता. असं त्याने मुलाखतीत सांगितले होते. नताशा आणि गौतम दोघेही आपल्या आयुष्यात खूप सुखी आहेत. गंभीरच्या दोन्ही मुलीही करोडपती असल्याचे स्पष्ट झाले आहे.

 

स्थावर आणि जंगम मिळून सुमारे एकशे पन्नास कोटी रुपयांची मालमत्ता त्यांच्याकडे आहे. गंभीरकडे 116 कोटी 38 लाख 96 हजार रुपये आणि पत्नीकडे एक कोटी 15 लाख 9 हजार 110 रुपयांची संपत्ती आहे. तर मुलगी अजीन गंभीरकडे 51 लाख 18 हजार तर दुसरी मुलगी अनैजा गंभीरकडे 12 लाख 21 हजार रुपये एवढी मालमत्ता आहे.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button