‘द काश्मीर फाईल्स’ चित्रपटाच्या दिग्दर्शकांच्या विरोधात पोलिसात तक्रार दाखल, अडचणीत येण्याची शक्यता?

मुंबई | सध्या द काश्मीर फाईल्स हा चित्रपट अत्यंत चर्चेत आला आहे. या चित्रपटाने चित्रपट सृष्टीत चांगलाच धुमाकूळ घालताना पाहायला मिळत आहे. काश्मीर पंडितांच्या जीवनावर भाष्य करणारा हा चित्रपट सगळे रेकॉर्ड ब्रेक करताना पाहायला मिळत आहे.

 

मात्र सध्या या चित्रपटाचे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री हे चर्चेत आले आहेत. ते अडचणीत येण्याची शक्यता असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यांनी केलेल्या एका वक्तव्याचा निषेध मोठ्या प्रमाणात होऊ लागला आहे.

 

“मी भोपाळ मध्ये मोठा झालो, पण मी भोपाळी नाही. भोपाळी हे वेगळं कनेक्शन आहे. भोपाळीचा आर्थ होतो. समलैंगिक” असे वादग्रस्त वक्तव्य त्यांनी केलं आहे. त्यामुळे अग्निहोत्री अडचणीत येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

 

त्यांच्या विरोधात एका 27 वर्षीय रोहित पांडे नावाच्या व्यक्तीने मुंबई मधील वर्सोवा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. तसेच लवकरात लवकर गुन्हा नोंद करण्याची देखील मागणी केली आहे. त्यामुळे गुन्हा नोंद होणार का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button