विनोदी कलाकार विजय पाटकर यांची पत्नी दिसते खूप सुंदर; करते ‘हे’ काम

मुंबई | मराठी चित्रपट सृष्टीतील नामवंत अभिनेते विजय पाटकर यांनी अनेक भूमिका साकारल्या आहेत. त्यांचे अनेक चित्रपट हे विनोदी आहेत. लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या बरोबर त्यांनी अनेकदा स्क्रीन शेअर केली. त्यांचा अभिनय खूप मोठा आणि दांडगा आहे. गणपतीपुळे या चित्रपटात देखील त्यांच्या अभिनयाने सगळ्यांची मने जिंकली होती.

 

त्यांनी अनेक चित्रपटांत हवलदर किंवा पोलीस अशा भूमिका केल्या आहेत. अशात विजय हे सोशल मीडियावर जास्त सक्रिय नसतात. अनेक चाहत्यांना त्यांच्या खासगी आयुष्याबद्दल जाणून घेण्याची नेहमीच उत्सुकता असते. त्यामुळे आज या बातमीमधून त्यांच्या आयुष्यातील काही खास गोष्टी जाणून घेणार आहोत.

 

विजय यांना लहान असताना पासून अभिनयाची खूप आवड होती. १९७९ पासुन आंतर महाविद्यालयीन स्पर्धांमधून त्यांनी अभिनयाची सुरुवात केली, आंतरबँकनाट्य स्पर्धातून नाट्य दिग्दर्शनाची सुरुवात केली. १९८३ पासुन त्यांनी व्यावसायिक नाटकात कामे केली, बोलबोल म्हणता, टूरटूर, मुंबई मुंबई,घर घर इत्यादी अनेक नाटकांमधून त्यांनी कामे केली, १९८५ पासुन आजवर त्यांनी अनेक चित्रपटात काम केले आहे, तुझ्यावाचून करमेना, नवरा माझा नवसाचा, झक मारली बायको केली पासुन अगदी अलीकडच्या गंमत, वन टू थ्री फोर,

 

अर्धनारी नटेश्वर, आय पी एल अश्या अनेक मराठी चित्रपटात त्यांनी महत्त्वाच्या भूमिका केल्या, त्याचप्रमाणे रिवायत, रिमांड होम, तेजाब, नरसिम्हा, क्या कूल है हम, ऑल द बेस्ट, गोलमाल ३ अश्या अनेक हिंदी चित्रपटात त्यांनी भूमिका केल्या आहेत. एक उनाड दिवस, चष्मे बहादूर, जावईबापू झिंदाबाद, सासू एक नंबरी जावई दस नंबरी, सगळं करून भागले अश्या काही चित्रपटांचे दिग्दर्शन आणि निर्मिती सुद्धा त्यांनी केली आहे. सध्या लाइफ इन दी डार्क या हिंदी चित्रपटांचे दिग्दर्शन देखील केले आहे.

 

त्यांच्या पत्नीचे नाव सरोज पाटकर असे आहे. अनेक मुलाखतीत त्यांनी सरोज यांच्या बद्दल सांगितले आहे. त्यांच्या यशाचे सर्व श्रेय ते सरोज यांना देतात. सरोजमुळे मी एवढा मोठा झालो असं ते नेहमी सांगतात. सरोज या खूप सुंदर दिसतात. तसेच त्या अभिनयापासून खूप दूर आहेत. त्या एक गृहिणी आहेत. या दोघांना शार्दुल नावाचा एक मुलगा देखील आहे.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button