विनोदी अभिनेते राजू श्रीवास्तव यांची प्रकृती आणखी चिंताजनक? देत आहेत मृत्यूशी अखेरची झुंज

दिल्ली | विनोदी अभिनेते राजू श्रीवास्तव यांची प्रकृती पुन्हा चिंताजनक बनत असल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिलेली आहे. व्यायाम करत असताना त्यांना हार्ट अटॅक आला त्यानंतर त्यांना तात्काळ दिल्ली मधील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

 

मात्र त्यांच्या प्रकृतीत विशेष सुधारणा आली नाही. सध्या आणखी पण राजू हे बेशुद्ध अवस्थेत असल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली आहे. अनेक कार्यक्रमाच्या माध्यमातून राजू यांनी रसिकांचे मनोरंजन केले आहे. रसिकांना खळखळून हसवणारा अभिनेता म्हणुन त्यांना ओळखले जाते.

 

त्यांनी अनेक चित्रपट आणि मालिकांमध्ये काम करून करोडो चाहत्यांच्या मनावर राज्य केलं आहे. मात्र सध्या ते मृत्यू सोबत अखेरची झुंज देत आहेत. सध्या त्यांची प्रकृती नाजूक सांगितली जात आहे. त्यामुळे राजू यांच्या नातेवाईकांमध्ये देखील चिंता पसरली आहे.

 

राजू यांचे फॅन्स फोलोईंग मोठे आहे. त्यामुळे त्यांचे चाहते देखील चांगलेच चिंतेत पडले आहेत. अनेकजण राजू यांना लवकर बरे करण्याची इच्छा देवाकडे मागताना दिसत आहेत. राजू श्रीवास्तव हे सध्या ५८ वर्षाचे आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button