विनोदी अभिनेते राजु श्रीवास्तव यांचे निधन

मुंबई | गेल्या काही दिवसांपासून मृत्यु शी झुंज देत असलेले अभिनेते राजू श्रीवास्तव यांचे अखेर निधन झाले आहे. अनेक दिवसांपासून ते रुग्णालयात दाखल होते. त्यांच्या प्रकृतीत विशेष सुधार येत नव्हता.
अनेक डॉक्टर त्यांच्यावर उपचार करत होते. मात्र मृत्यू सोबत असलेली त्यांची झुंज अखेर अयशस्वी ठरली आहे. त्यांनी आज अखेरचा श्वास घेतला आहे. ते एक प्रसिध्द विनोदी कलाकार म्हणून ओळखले जायचे.
त्यांनी बॉलीवुड मधील अनेक चित्रपटांमध्ये भूमिका साकारून करोडो चाहत्यांच्या मनावर राज्य केलं. तसेच त्यांनी अनेक शो मध्ये देखील काम केले आहे. त्यांनी १००हून अधिक चित्रपटांमध्ये भूमिका साकारली होती.
हृदयविकाराचा झटका आल्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र अनेक दिवस उपचार घेऊन देखील त्यांच्या प्रकृतीत विशेष सुधारणा आली नाही. त्यांच्या मेंदूने देखील काम करणं बंद केलं होत.
अनेक त्यांच्या चाहत्यांनी परिवारातील सदस्यांनी ते बरे होण्यासाठी देवाकडे प्रार्थना केली होती. मात्र मृत्यू सोबत असलेली अनेक दिवसांची झुंज अखेर अयशस्वी ठरली आहे. अखेर त्यांचं निधन झाले आहे. त्यांच्या निधनाने बॉलिवूड वर शोककळा पसरली आहे..