कॉमेडियन कपिल शर्माची पत्नी दिसते खूप सुंदर; करते हे काम

मुंबई | कपिल शर्माने गिन्नीच्या फोटोसह एक खास ट्विट केले. सुरुवातीच्या पहिल्या ट्विटमध्ये, मी पुढच्या ३० मिनिटात तुमच्यासोबत एक खास गोष्ट शेअर करणार असल्याचे, त्याने म्हटले. त्यानंतर दुसऱ्या ट्विटमध्ये कपिलने त्याच्या प्रेयसीसोबतचा फोटो ट्विट करत लिहले की, ही माझी अर्धांगिनी आहे असे मी म्हणणार नाही.
ती मला पूर्णत्व आणते. लव्ह यू गिन्नी…. कृपया हिचे स्वागत करा.. मी तिच्यावर खूप प्रेम करतो. कपिलच्या या ट्विटनंतर ही गिन्नी आहे तरी कोण? असा त्याच्या चाहत्यांना प्रश्न पडला असेल. तर, कॉलेजच्या दिवसांपासून कपिल आणि गिन्नी एकमेकांना ओळखतात. मैत्रीपासून सुरुवात झालेल्या या नात्याचे प्रेमात रुपांतरण होण्यास काही वेळ लागला, अशी माहिती सुत्रांनी दिली आहे.
गेली 10 वर्षे दोघं होती एकत्र:
आयुष्याच्या चढ-उतारामध्ये या दोघांनीही एकमेकांची साथ सोडली नाही. गिन्नी चतार्थ आणि कपिल शर्मा यांच्याबद्दलच्या काही अपरीचित गोष्टी म्लणजे, पंजाब येथील जालंधरमध्ये महाविद्यालयीन प्रशिक्षण घेत असताना या दोघांची भेट झाली. या दोघांनीही स्टॅण्ड अप कॉमेडियन म्हणून करिअरला सुरुवात केली होती. महाविद्यालयात असताना कपिल स्वतः गिन्नीसाठी काही शोचे काम मिळवून द्यायचा. जवळपास 10 वर्षांपासून हे प्रेमीयुगुल एकत्र आहे.
सध्या जालंधर येथे राहत असलेली गिन्नी लग्नानंतर ‘के९’ या कपिलच्या निर्मिती संस्थेची धुरा सांभाळत आहे. गिन्नी आणि कपिल ‘हस बलिये’ कार्यक्रमात एकत्र दिसले होते. या कार्यक्रमादरम्यान त्यांच्यात जवळीक निर्माण झाली. या कार्यक्रमात विजेतेपद त्यांना मिळाले नाही. मात्र, त्यांच्या कामाची तेव्हा बरीच प्रशंसा झाली होती.