विनोद अभिनेत्री भारती सिंगचा भीषण अपघात; गंभीर जखमी

मुंबई | प्रसिद्ध कॉमेडियन भारती सिंगची प्रसिद्धी आज गगनाला भिडलेली आहे. तिच्या विनोदी अभिनयाबद्दल विशेष काही सांगण्याची गरज नाही. आज प्रत्येकच व्यक्ती भारती सिंगला खूप चांगल्या पद्धतीने ओळखत आहे. हिंदी मनोरंजन विश्वात नाव कमवायचा निर्णय घेतल्यानंतर भारतीने मोठ्या संघर्षाने विनोदी अभिनेत्री म्हणून नावलौकिक मिळवला आहे. तिच्या विजयाचे आणि कामाचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे.

 

भारती ही दिसायला तितकीशी सुंदर नाही तसेच ती स्तुल देखील आहे. अशात अभिनय क्षेत्र म्हटल्यानंतर सडपातळ बांधा आणि सुंदर चेहरा या गोष्टी अभिनेत्रींसाठी खूप महत्त्वाच्या ठरतात. मात्र यातील एकही गोष्ट भारतीकडे नाही. तरीदेखील आपल्या दमदार अभिनयाने तिने सुंदरतेची व्याख्या बदलून टाकली आहे. सुंदर रूप आणि देखणे पण या सर्व गोष्टी फार काळ टिकत नाहीत टिकतो तो फक्त आणि फक्त आपला दमदार अभिनय. हे सर्व काही भारतीने तिच्या अभिनयातून वारंवार सिद्ध करून दाखवले आहे.

 

भारतीने रुपेरी पडद्यावर देखील दमदार कामगिरी केलेली आहे. साल 2011 मध्ये एक नूर या पंजाबी चित्रपटामधून तिने चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. त्यानंतर तिने बॉलीवूडच्या खिलाडी ७८६ या चित्रपटामध्ये देखील काम केले. यामध्ये अभिनेता अक्षय कुमार बरोबर तिने स्क्रीन शेअर केली. तसेच जेट आणि जुलीएट 2 या चित्रपटामध्ये देखील तिचा दमदार अभिनय पाहायला मिळाला. सनम रे या चित्रपटामध्ये ती शेवटची दिसली होती.

 

चाल 2008 मध्ये द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज मध्ये तिने सहभाग घेतला होता. या कार्यक्रमाची ती दुसरी उपविजेती ठरली होती. त्यानंतर अनेक विनोदी कार्यक्रमांमध्ये स्पर्धक म्हणून सहभाग नोंदवला. यामध्ये कॉमेडी सर्कस 3 का तडका, कॉमेडी सर्कस महासंग्राम, कॉमेडी सर्कस के सुपरस्टार, कॉमेडी सर्कस का जादू अशा कार्यक्रमांचा समावेश आहे. हिंदी वाहिनीवरील एफआयआर या मालिकेमध्ये देखील भारतीने महत्वपूर्ण भूमिका साकारली होती.

 

काही दिवसांपूर्वी भारती सिंगचे यश लिंबाच्या बरोबर लग्न झाले. या दोघांनी एका बाळाला देखील जन्म दिला आहे. आपल्या मुलाला ते लाडाने गोला असे संबोधतात. भारती सोशल मीडियावर आपल्या मुलाबरोबरचे अनेक व्हिडिओ पोस्ट करत असते. अशात आता तिच्या चाहत्यांमध्ये चिंता वाढवणारी एक बातमी समोर आली आहे. भारतीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. यामध्ये भारती गंभीर रित्या जखमी झालेली दिसत आहे.

 

व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की एका झोक्यावरती झोपाळा घेत असताना ती धाडकन खाली आदळते. यामध्ये तिला गंभीर दुखापत झालेली आहे. ज्यामुळे सध्या तिच्यावर उपचार सुरू आहेत. भारतीचा हा अपघाती व्हिडिओ पाहून तिचे चाहते तिच्याविषयी चिंता व्यक्त करत आहेत. तसेच अनेक जण ती लवकर बरी व्हावी अशी प्रार्थना देखील करत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button