Business Loan | अनेकांना व्यवसायाची सुरुवात करायची असते मात्र भांडवल नसल्यामुळे व्यवसायाचे स्वप्न अपूर्ण राहते. बँकेकडून कर्ज घ्यायला गेल्यावर बॅंका तारण काहीतरी मागतात पण तारण देण्यासाठी मालमत्ता नसते आणि याच कारणामुळे अनेक जण स्वतःचा व्यवसाय करू शकत नाहीत. आणि व्यवसाय करण्याचं त्यांचं स्वप्न अपूर्ण राहते. आज आपण या लेखाच्या माध्यमातून विनातारण ५० लाख पर्यंत कर्ज घेऊन त्यावर ३५ टक्क्यांपर्यंत सबसिडी कशी मिळवायची याची सविस्तर माहिती घेणार आहोत. Cmegp loan Apply Maharashtra
हे कर्ज घेण्यासाठी अर्ज कसा करायचा तसेच कोणती कोणती कागदपत्र यामध्ये जोडायची याची सविस्तर माहिती आम्ही सांगणार आहे. शासनाने अशा अनेक योजना तरुणांसाठी आणल्या आहेत. मात्र त्या योजनेची माहिती नसल्यामुळे अनेक तरुण – तरुणी त्यापासून वंचित आहेत. मात्र योजना आणि त्या योजनेचा कसा लाभ मिळवायचा याची योग्य दिशा आज मी तुम्हाला सांगणार आहे. हा लेख तुम्ही सविस्तर वाचून यामध्ये दिलेल्या लिंकवर जाऊन तुम्ही व्यवस्थित अर्ज करू शकता. Cmegp Loan Document List
महाराष्ट्र सरकारने Chief Minister Employment Genration Program म्हणजेच मुख्यमंत्री रोजगार निर्मिती या योजनेची २०१९ रोजी स्थापना केली. बेरोजगार तरुणांना रोजगार उपलब्ध व्हावा. तसेच ग्रामीण भागातील तरुण तरुणींच्या हाताला काम मिळून प्रत्येक जण स्वतःवर अवलंबून राहून परिवाराचे पालन पोषण करावे हा या योजनेचा मुख्य हेतू आहे. या योजनेच्या माध्यमातून अनेकांना लाभ मिळाला आहे. Cmegp loan apply maharashtra 2026
बँकेच्या कर्जावर ३५ टक्के पर्यंत सबसिडी दिली जाते. जर उदाहरण तुम्ही बँकेकडून ५० लाख रुपयांचे कर्ज घेतले आणि तुम्हाला जर ३५ टक्के सबसिडी मिळाली तर तुम्हाला १७ लाख ५० हजार रुपये अनुदान या मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम योजनेतून मिळणार आहे. त्यामुळे १ कोटी रुपयाला लागणारे व्याज कमी होऊन तुमच्या व्यवसायाला याचा मोठा फायदा होणार आहे. कोणत्याही राष्ट्रीयीकृत बँकेत या योजनेचा लाभ घेऊ शकता. How to apply loan maharashtra
या योजनेच्या माध्यमातून उत्पादक (manufacturing), सेवा (Service), कृषी व्यवसाय (Farm Business) यातील व्यवसायांसाठी कर्ज दिले जाणार आहे. Manufacturing व्यवसायासाठी ५० लाख रुपये कर्ज तर Service उद्योगांसाठी २० लाख रुपये कर्ज देण्यात येत. विविध वेग – वेगळ्या घटकांवर या कर्जाची मर्यादा अवलंबून आहे. मॅन्युफॅक्चरिंग आणि सेवा उद्योग यातील नेमका फरक तुम्हाला उदाहरणासहित सांगतो.
उत्पादन (Manufacturing) आणि सेवा (Service) यातील नेमका फरक जाणून घेऊ –
- उत्पादन (Manufacturing) – म्हणजे बाजार पेठेत विकणाऱ्या कोणत्याही वस्तूचे उत्पादन करणे. उदा. खिळा, तार, तेल, बेसन आणि सगळेच.
- सेवा (Service) – म्हणजे तुम्ही मार्केट मधून एखादा प्रॉडक्ट होलसेल दरात विकत घेऊन जर तुम्ही दुकान सुरू केले. त्यामध्ये त्या दुकानाच्या संबंधी इतर सर्व प्रॉडक्ट ठेऊन त्याची ग्राहकांना विक्री करणे हा सेवा उद्योगातील प्रकार आहे.
या व्यवसायासाठी कर्ज आणि सबसिडी मिळणार नाही –
- मद्यनिर्मिती
- तंबाखू निर्मिती
- प्लास्टिक बॅग
- आणि शासनाने बंदी घातलेले उद्योग
ठरवून दिलेला अनुदान दर –
- सर्वसाधारण प्रवर्ग (Genral) – १५% ते २५%
- ST/SC/OBC महिला, मा. सैनिक अपंग – २५% ते ३५%
(ग्रामीण भागात जनरल प्रवर्गाला २५ टक्के तर इतर मागासवर्गीयांना ३५ टक्के)
कागदपत्रांची यादी (Document List) –
- आयडेंटी फोटो (Identity Photo)
- आधार कार्ड (Aadhar Card)
- पॅनकार्ड (Pancard)
- जन्म दाखला (Birth Certificate)
- डोमासाईल (Domasile)
- शैक्षणिक दाखला (Education Certificate)
- योजनेचे हमी पत्र (Undertaking Form)
- पूर्ण प्रकल्प अहवाल (Project Report)
- जात प्रमाणपत्र (Caste Certificate) लागू असल्यास
- लोकसंख्या दाखला (Population Certificate)
पुढे काय?
तुम्ही मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम योजनेत अर्ज केल्यानंतर जी बँक तुम्ही सिलेक्ट केली आहे. त्या बँकेतून फोन येईल, किंवा तुम्ही केलेल्या अर्जाची पावती घेऊन बँकेत जाऊन बँक सांगेल ती कागदपत्र जमा करा. त्यांनंतर तुमच कर्ज मंजूर करण्याची प्रोसेस केली जाईल.
| अर्ज करा | APPLY NOW |
| फॉर्म | DOWNLOAD NOW |
| अधिकृत वेबसाईट | VIEW NOW |




