आत्ताच्या घडामोडी

सिनेसृष्टी हादरली! प्रसिध्द अभिनेत्रीचे निधन; शिल्पा शेट्टी सोबत केलेत अनेक चित्रपट, १००हून अधिक चित्रपटात साकारली होती भूमिका

दिल्ली | हॉलीवुड अभिनेत्रींच्या निधनाच्या बातम्या सातत्याने समोर येत आहेत. अशात आज पुन्हा एकदा हॉलिवूड साठी एक मोठी दुःखद बातमी समोर आली आहे. ‘अनदर द वर्ल्ड’ या प्रसिद्ध मालिकेतील अभिनेत्री ॲने हेचचे निधन झाले आहे. या अभिनेत्रीने आता पर्यंत हॉलिवूडमध्ये उल्लेखनीय कामगिरी केली आहे. मात्र तिच्या निधनाने सगळीकडे शोकाकुल वातावरण पसरले आहे. अनेक कलाकार आसवांनी भरलेल्या डोळ्यांनी अभिनेत्रीला निरोप देत आहेत.

 

सहा दिवसांपूर्वी या अभिनेत्रीचा गंभीर अपघात झाला होता. या अपघातात तिला खूप दुखापत झाली असून ती खूप भाजली देखील होती. त्यामुळे गेल्या सहा दिवसांपासून तिच्यावर उपचार सुरू होते. मात्र वयाच्या 53 व्या वर्षी तिने अखेरचा श्वास घेतला आहे. अपघात घडल्यामुळेच या अभिनेत्रीचा मृत्यू झाला आहे. मात्र डॉक्टरांनी तिला वाचवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न केले. पण ती या अपघातातून वाचू शकली नाही.

 

अभिनेत्रीच्या निधनानंतर आता बॉलिवूड अभिनेत्री प्रियंका चोप्राने एक पोस्ट शेअर करत हॉलीवुड अभिनेत्रीच्या निधनावर दुःख व्यक्त केले आहे. तिने आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, ” तुझ्याबरोबर मला काम करायला मिळाले यात मी माझे भाग्य समजते. तू एक उत्तम कलाकार होती. तुझ्या निधनामुळे आम्ही खूप दुःखी आहोत. पण तु जिथे कुठे असशील तिथे तुझ्या आत्म्याला शांती लाभो.” तिच्या पोस्टमध्ये पुढे तिने हॉलिवूड अभिनेत्रीच्या कुटुंबीयांविषयी देखील काळजी व्यक्त केली आहे.

 

नॅन्सी डेव्हिस ही हेचची खूप चांगली मैत्रिण होती. सर्वात आधी या मैत्रिणीनेच अभिनेत्रीच्या निधनाची माहिती दिली. एंजेलिसमधील एका ठिकाणी अभिनेत्रीच्या कारचा अपघात झाला. ही घटना ५ ऑगस्ट रोजी घडली. यावेळी अभिनेत्री तिच्या कारमधून एका ठिकाणी चालली होती. मात्र तिच्या कारचा अपघात झाला. तिची गाडी एका इमारतीला धडकली. यामध्ये कारचा मोठा ब्लास्ट झाला. बघता बघता इमारतीला देखील आग लागली.

 

यावेळी अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी दाखल झाले. एक तास प्रयत्न केल्यानंतर ही आग विझली. यावेळी अभिनेत्री पूर्णता भाजली होती. तिच्या मेंदूला देखील दुखापत झाली होती. त्यामुळे गेल्या सहा दिवसांपासून तिच्यावर उपचार सुरू होते. मात्र हे सर्व उपचार अयशस्वी ठरले आहेत

ॲनेचे प्रवक्ते यांनी दिलेल्या माहितीनुसार, तिला खूप गंभीर दुखापत झाली होती. त्यामुळे तिची वाचण्याची शक्यता आधीच कमी होती. कॅलिफोर्नियाच्या कायद्याप्रमाणे अभिनेत्रीला मृत घोषित करण्यात आले आहे. तसेच तिचे अवयव देखील दान केले जाणार असल्याचे प्रवक्त्याने सांगितले.

 

गेले सहा दिवस या अभिनेत्रीला जिवंत राहण्यासाठी सपोर्ट मिळेल अशा यंत्रावर ठेवले गेले होते. मात्र हे यंत्र आता काढून घेतले गेले आहे. अभिनेत्रीची वाचण्याची शक्यता फार कमी होती. अशात तिच्या निधनाने हॉलीवुड पूर्णतः होरपळून निघाले आहे.

 

सोशल मीडियावर चाहत्यांनी अभिनेत्रीसाठी शोक व्यक्त केला आहे. तसेच अनेक जण तिच्या जुन्या आठवणींमध्ये तिला शोधत आहेत. या अभिनेत्रीने हॉलीवुड मध्ये अनेक चित्रपट आणि मालिकांमध्ये काम केले. त्यामुळे तिचा चाहता वर्ग प्रचंड मोठा होता. अभिनेत्रीच्या चित्रपटांच्या आणि मालिकांच्या क्लिप आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button