आत्ताच्या घडामोडीमनोरंजन

सिनेसृष्टी हादरली! आणखी एका प्रसिध्द अभिनेत्रीने गळफास घेऊन केली आत्महत्या

दिल्ली | बंगाली अभिनेत्री पल्लवी डे हिचे निधन झाले आहे. तिने बंगाली सिनेसृष्टीत अनेक मोठमोठे चित्रपट केले होते. तसेच तिने अनेक मालिकांमध्ये देखील काम केले होते. तिच्या आकस्मित निधनाने बंगाली सिनेसृष्टी हादरून गेली आहे. पल्लवी तिच्या घरामध्ये मृत अवस्थेत आढळली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली तेव्हा तिचा मृतदेह त्यांना पंख्याला लटकलेला आढळला. अभिनेत्रीने फाशी घेऊन स्वतःचे जीवन संपवले आहे.

 

प्राथमिक तपासाच्या आधारे, पोलिसांचे म्हणणे आहे की, पल्लवीचा मृत्यू आत्महत्येनेच झाला आहे. मात्र अभिनेत्रीच्या कुटुंबीयांनी तिच्या बॉयफ्रेंड वर तिच्या निधनाचा आरोप लावला आहे. दरम्यान, पोलीस अधिकारी पल्लवीचा लिव्ह-इन पार्टनर साग्निक चक्रवर्ती याचीही चौकशी करत आहेत.

 

साग्निकच्या पालकांनी, तथापि, सर्व आरोप नाकारले आणि म्हणाले की तरुण जोडप्यामध्ये कोणतीही मोठी समस्या नाही. मीडियाशी बोलताना साग्निकची आई म्हणाली, “ते दोघे एकत्र राहत होते. आमचा पूर्ण पाठिंबा नसला तरी ते मोठे असल्याने आम्ही त्यांना परवानगी दिली. काही वेळा मी साग्निकला लग्न झाल्यावर दुसरीकडे राहायला आणि एकत्र राहायला सांगितलं होतं. त्यांना कोणतीही मोठी समस्या नव्हती. मला माहित नाही काय झाले.”

 

‘मोन माने ना’ या मालिकेत पल्लवी बरोबर काम करणारी तिची सहकार्यकार अनमित्रा बताब्याल पल्लवीच्या निधनाची बातमी वाचून चकित झाली. तिचा या बातमीवर विश्वास बसत नव्हता. कारण पल्लवीचे निधन होण्याच्या दोन दिवस आधी या दोघीजणी भेटल्या होत्या. चित्रपटाच्या सेटवर या दोघांची भेट झाली होती. यावेळी तिची सहकलाकार अभिनेत्री म्हणाली की, पल्लवी पूर्णता ठीक होती. ती कोणत्या नैराश्यात आहे असे मला अजिबात जाणवले नाही. तिच्या निधनाची बातमी माझ्यासाठी खूप मोठा धक्का आहे.”

 

१५ मे २०२२ रोजी या अभिनेत्रीने गळफास घेऊन स्वतःचे जीवन संपवले. यावेळी तिचे वय फक्त २१ वर्षे होते. पल्लवी डेच्या अभिनयाबद्दल सांगायचं झाले तर अभिनेत्रीने कुंजा छाया, मोन माने ना, रेशम झापी आणि अशा अनेक लोकप्रिय बंगाली मालिकांमध्ये काम केले होते. तिच्या अकाली निधनाने संपूर्ण बांगला टीव्ही इंडस्ट्रीला धक्का बसला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button