आत्ताच्या घडामोडी

शुटिंगसाठी लवकर पोहचता यावं म्हणून लोकप्रिय अभिनेत्याने केला लोकल मधून प्रवास; गर्दी पाहून म्हणाला…

पुणे | मुंबई चित्रपट सृष्टीने मराठी आणि हिंदी चित्रपट सृष्टीला अनेक दिग्गज कलाकार दिले आहेत. घरून सगळं सोडून आल्यावर मुंबईत स्ट्रगल करून मोठं व्हावं लागतं. हक्काचं शहर म्हणून मुंबई कडे पाहिलं जात. अभिनय क्षेत्रात मोठं व्हायचं असेल तर मुंबईला आपलंसं करावं लागत.

 

असं म्हटलं जात. याच मुंबईतील लोकल ट्रेन मधील गर्दी मध्ये एक दिग्गज अभिनेत्याने प्रवाशांसोबत प्रवास केला आहे. मात्र अभिनेत्याच्या तोंडावर मास्क असल्यामुळे त्याला कोणीही ओळखू शकले नाही.

 

यापूर्वी देखील लवकर पोहचण्यासाठी अनेक सेलिब्रिटींनी अशा प्रकारे प्रवास केला आहे. शूटिंग साठी लवकर पोहचण्यासाठी स्वतःची लग्सरी कार सोडून गर्दीमध्ये प्रवास करणारे अभिनेते, अभिनेत्री फार कमी आहेत.

 

असाच एक प्रत्यय आला आहे. तो म्हणजे दिग्गज सेलिब्रिटी सागर कारंडे यांचा, गेल्या काही दिवसांपूर्वी त्यांना नाटकाच्या प्रयोगासाठी लवकर पोहचायचे होते. ट्रॅफिक खूप असल्यामुळे ते कारणे जाऊ शकत नव्हते.

 

त्यामुळे त्यांनी लोकल ट्रेनचा मार्ग धरला आणि ते ट्रेनने प्रवास करून नाटकाच्या प्रयोगासाठी वेळेवर पोहचले. याचे फोटो त्यांनी स्वतः त्यांच्या सोशल मीडियावर शेअर केले आहेत. सागर कारंडे हे रियालिटी शोमध्ये काम करतात.

 

चला हवा येऊद्या या कार्यक्रमाने त्यांना मोठं केल्याचं सांगितलं जातं आहे. कारंडे यांचं फॅन फॉलोविंग देखील मोठं आहे. त्यांच्या अभिनयाची अनेकांना भुरळ पडली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button