‘या’ भारतीय खेळाडूंचे करिअर धोक्यात? वाचा लिस्ट

मुंबई | यंदा होणारा T 20 कप अधिक चुरशीचा होणार आहे. यासाठी भारतीय संघाने तयारी देखील सुरू केली आहे. मात्र या सामन्यांमध्ये कोणत्या कोणत्या खेळाडूला संधी मिळणार हे पाहावं लागणार आहे. कारण या T20 कप नंतर अनेक दिग्गज खेळाडू संन्यास घेण्याच्या तयारीत आहेत.

 

टीम इंडियाची सूत्रे रोहित शर्माच्या हाती आली आहेत. रोहित हा युवा खेळाडूंना जास्त संधी देतो त्यामुळे भविष्यात जुन्या खेळाडूंना संधी मिळणार नाही. असेही बोललं जात आहे. माञ त्यापूर्वी काही खेळाडू संन्यास घेतील असा अभ्यासकांनी दावा केला आहे.

 

यात पहिल्या क्रमांकावर नाव येतं ते म्हणजे भारतीय संघाचा गोलंदाज मोहमद शमी, गेल्या काही दिवसांपासून सातत्याने त्याला बाहेर ठेवलं जात. T 20 नंतर तो संन्यास घेऊ शकतो. आणि त्याच्या जागी हर्षल पटेल, आवेश खान अर्शदिप सिंह या पैकी एकाची वर्णी लागू शकते.

 

गेल्या काही दिवसांपासून बॅटमॅन शिखर धवन देखील फॉर्म मध्ये नाही. त्यामुळे त्याला देखील अनेक सामन्यांमध्ये बाहेर ठेवण्यात आले होते. मात्र आता त्याला पुन्हा घेण्यात आले आहे. येत्या t 20 नंतर तो संन्यास घेईल अशी शक्यता वर्तवली जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button