Business Idea 2026: कमी गुंतवणुकीमध्ये गावामध्ये चालणारे व्यवसाय, शासकीय अनुदानाचाही घेता येईल लाभ

ग्रामीण भागात व्यवसाय करणाऱ्या होतकरू तरुणांसाठी शासनाने PMEGP / CMEGP MUDRA अशा अनेक योजना राबविल्या आहेत. लाखो तरुणांनी या योजनेचा लाभ घेऊन व्यवसाय सुरू केले आहेत.

March 24, 2026 9:36 AM
Business Idea 2026

Business Idea 2026 | अनेक ग्रामीण भागातील तरुणांना व्यवसाय करण्याची इच्छा असते मात्र कोणता व्यवसाय करावा? या प्रश्नाचे उत्तर त्यांच्याकडे नसल्यामुळे अनेकजण व्यवसाय करत नाहीत. आज आम्ही तुम्हाला कमी गुंतवणुकीत गावांमध्ये चालणाऱ्या व्यवसायांची माहिती देणार आहोत. अत्यंत कमी गुंतवणुकीत आणि परवाने लागणारे ग्रामीण भागात अनेक व्यवसाय चांगला नफा मिळवून देऊ शकतात. तुमच्याकडे जर कमी भांडवल असेल आणि तुम्हाला चांगला नफा मिळवायचा असेल तर तुम्ही आम्ही दिलेल्या व्यवसायांच्या माध्यमातून चांगली कमाई करू शकता.

हा व्यवसाय करण्यासाठी शासकीय अनुदान आणि कर्ज देखील मिळू शकते. ग्रामीण भागात व्यवसाय करणाऱ्या होतकरू तरुणांसाठी शासनाने PMEGP / CMEGP MUDRA अशा अनेक योजना राबविल्या आहेत. लाखो तरुणांनी या योजनेचा लाभ घेऊन व्यवसाय सुरू केले आहेत, आणि ते यशस्वी देखील करून दाखविले आहेत. मराठीत एक वाक्य उच्चारले जाते ‘व्यवसाय करण्यासाठी पैसा नाही तर डोक लागत.’ याच प्रमाणे आज आपण तुमच्या परिसरातील अभ्यासानुसार चालणाऱ्या व्यवसायांची यादी पाहणार आहोत.

READ MORE – कुक्कुटपालन व्यवसाय शेतकऱ्यांसाठी योग्य जोडधंदा

ग्रामीण भागात चालणारे सर्वोत्तम व्यवसाय (small business ideas in village Marathi)

  • डेअरी प्रॉडक्ट – ग्रामीण भागात हा व्यवसाय तुम्ही तुमच्या गावामध्ये करू शकता. नामांकित डेअरी कंपनीची फ्रँचायशी घेऊन हा व्यवसाय तुम्हाला चांगला नफा मिळवून देईल. अत्यंत कमी भांडवलात हा व्यवसाय चालविला जाऊ शकतो.
  • किराणा दुकान – दैनदिन गरजेसाठी सर्वाधिक लोकप्रिय व्यवसाय म्हणून ओळखला जातो. कमी गुंतवणुकीत हा व्यवसाय गावामध्ये सुरू केला जाऊ शकतो. या व्यवसायासाठी विशिष्ट प्रकारचे परवाने देखील लागत नाहीत. शॉपक्ट आणि उद्यम आधार काढून हा व्यवसाय चालविला जातो.
  • पिठाची गिरणी – दैनंदिन जीवनामध्ये अत्यावश्यक सेवेत हा चांगला नफा मिळवून देणारा व्यवसाय आहे. गावामध्ये छोट्याशा जागेमध्ये हा व्यवसाय केला जाऊ शकतो. अत्यंत कमी भांडवल गुंतवणुकीत चांगला नफा देणारा व्यवसाय म्हणून याची ओळख आहे.
  • मोटार गॅरेज – सध्या प्रत्येकाकडे २ चाकी आणि ४ चाकी गाड्या आहेत. यामुळे जर तुम्ही या गाड्या दुरुस्त करण्याचे गॅरेज टाकले तर त्यातून देखील तुम्हाला चांगला नफा मिळू शकतो. कमी भांडवलात सुरू होणारा हा व्यवसाय आहे.
  • वेल्डिंग शॉप – गावाकडे शेती असल्यामुळे शेतकऱ्यांना विविध प्रकारांच्या औजारांची वेल्डिंग करणे, शेड बांधणे अशी कामे करावी लागतात. जर तुम्ही गावामध्ये वेल्डिंग शॉप टाकले तर त्यातून चांगला नफा तुम्हाला मिळू शकतो.
  • कपड्याचे दुकान – कपडे हे दैनदिन वापरतील वस्तू आहे. त्यामुळे तुम्ही गावाकडे जर हा व्यवसाय सुरू केला तर यामधून देखील तुम्हाला चांगला नफा मिळू शकतो. कमी गुंतवणुकीत जास्त उत्पन्न देणारा हा व्यवसाय आहे.
  • नाश्ता सेंटर – हा व्यवसाय हॉटेल व्यवसायातील लोकप्रिय व्यवसाय आहे. या व्यवसायाची सध्याच्या काळात खूप गरज आहे. हा व्यवसाय सुरू करण्यासाठी जास्त पैशांची गरज नाही. मात्र यातून चांगला नफा मिळू शकतो.
  • हार्डवेयर शॉप – गावच्या परिसरातील शेतकऱ्यांना टारगेट करून हा व्यवसाय केला जाऊ शकतो. शेतीसाठी लागणारे साहित्य तुम्ही विकून चांगला नफा कमवू शकता. हा व्यवसाय कमी जागेत केला जाऊ शकतो.
  • कृषी पूरक व्यवसाय – खते बियाणे (BSC Agree) तसेच ड्रिप पाईप मटेरियल विकून या व्यवसायातून लाखो रुपये कमविले जाऊ शकतात. मात्र वरील व्यवसायाच्या तुलनेत या व्यवसायासाठी भांडवल जास्त लागते.

READ MORE – इलेक्ट्रिक चार्जिंग स्टेशन सुरू करा आणि कमवा लाखो रुपये

व्यवसाय करण्यापूर्वी या गोष्टींचा अभ्यास करणे महत्त्वाचे आहे. (Business Idea 2026)

गावातील तसेच तुमच्या परिसरातील लोकांना कशाची कमतरता आहे. तुमच्या गावची लोकसंख्या किती आहे. आणि तुम्ही जो व्यवसाय सुरू केला आहे, त्यामध्ये अगोदरच किती व्यवसाय आहेत. याचा संपूर्ण अभ्यास करूनच व्यवसाय करावा. गावातील लोकांना दर्जा आणि चांगली सेवा दिल्यानंतर कोणताही व्यवसाय गावामध्ये चालू शकतो. हे व्यवसाय सुरू करण्यासाठी तुम्हाला शासकीय योजनांचा देखील लाभ मिळू शकतो. त्यासाठी तुम्हाला तुमच्या जिल्ह्याच्या ठिकाणी असलेल्या खादी ग्राम उद्योग विभागात जाऊन चौकशी करावी लागेल, किंवा जवळच्या राष्ट्रीयकृत बँकेत जाऊन चौकशी करू शकता. तुम्ही घेतलेल्या कर्जावर शासन अनुदान प्रदान करते.

READ MORE – शेळीपालन व्यवसाय करण्यासाठी ७५ टक्क्यांपर्यंत अनुदान

Mr. Ganesh Chavan

Ganesh Tanaji Chavan is a digital media professional and founder of Maharashtra Update. He has experience working with Pudhari Media Group and Loksatta.com, delivering reliable news, government scheme updates, and job information across Maharashtra. His mission is to provide accurate and trustworthy information to readers.

Subscribe YouTube

Subscribe

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment