आत्ताच्या घडामोडीभारत

BREAKING | गरिबांसाठी मोदींचं मोठं पाऊल, ३० सप्टेंबर पर्यंत घेता येणार ‘या’ योजनेचा फायदा

दिल्ली | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सत्तेत आल्यापासून अनेक मोठ्या योजना राबविल्या आहेत. तसेच त्या योजना यशस्वी देखील करून दाखविल्या आहेत. त्यात पंतप्रधान सन्मान निधी ही योजना अव्वल स्थानी येत आहे.

 

गेल्या अनेक दिवसांपासून देशात कोरोनाच मोठं संकट येऊन ठेपल होत. यामुळे गोर गरीब जनतेला उपाशी झोपाव लागत होत. कोरोनामुळे सगळीकडे लॉकडाऊन करण्यात आल्यामुळे गरिबांची उपासमार होत होती.

 

त्यामुळे गरीबांसाठी मोदींनी एक योजना सुरू केली होती. पंतप्रधान गरीब कल्याण योजना सुरू केली. या योजनेच्या अंतर्गत प्रत्येक गरीब व्यक्तीला 5 किलो धान्य दिले जात होते. त्यामुळे ही योजना गरिबांची आधार बनली होती.

 

हो योजना 31 मार्च रोजी संपणार होती. मात्र या योजनेचा कालावधी वाढविण्यात आला आहे. पंतप्रधान मोदींनी शनिवारी रात्री मंत्रिमंडळाची बैठक घेऊन या योजनेचा कालावधी वाढविला आहे. आता पुढील 6 महिने ही योजना सुरू राहणार आहे.

 

30 सप्टेंबर पर्यंत या योजनेचा कालावधी वाढविण्यात आला आहे. त्यामुळे गरिबांना मोठा दिलासा मिळाल्याचे पाहायला मिळत आहे. मोदींच्या या निर्णयाचे सर्वत्र कौतुक होताना देखील पाहायला मिळत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button