क्रिकेट

BREAKING | 115 सामन्यांमध्ये दमदार खेळी करणाऱ्या आंतराष्ट्रीय खेळाडूचा क्रिकेटला रामराम

मुंबई | आशिया चषक स्पर्धेच्या रणधुमाळीत एक मोठी ब्रेकिंग न्युज समोर आली आहे. यात एका अष्टपैलू खेळाडूने क्रिकेटमधून संन्यास घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्याच्या निर्णयाने सर्वजण थक्क झाले आहेत. आजवर त्याने 118 सामन्यात 2679 धावा केल्या आहेत. तसेच 115 सामने त्याने खेळले आहेत. त्याने तडकाफडकी घेतलेल्या निर्णयामुळे सर्वच चाहते गोंधळून गेले आहेत. न्यूझीलंडच्या कॉलिन डी ग्रँडहोम या खेळाडूने हा निर्णय घेतला आहे.

 

वयाच्या फक्त 36व्या वर्षी त्यानी हा निर्णय घेतल्याने सर्वच जण चकित झाले आहेत. तसेच त्याने हा निर्णय कोणत्या कारणास्तव घेतला आहे याविषयी सोशल मीडियावरती चर्चांना उधाण आले आहे. कॉलिन डी ग्रँडहोम या अष्टपैलू खेळाडूने नुकतेच आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेतून निवृत्ती घेतली असल्याचे जाहीर केले आहे. खूप कमी वयामध्ये त्याने क्रिकेटला रामराम ठोकला आहे. न्यूझीलंडसाठी ही मोठी हानी आहे.

 

नुकतेच बोर्डाने ग्रँडहोमला त्याच्याबरोबर झालेल्या करारामधून त्याला मुक्ती दिली आहे. न्यूझीलंड क्रिकेट संघाशी चर्चा केल्यानंतर त्याने हा निर्णय घेतला असल्याची माहिती समजली आहे. निवृत्ती घेत असताना त्याने सांगितले आहे की, ” मी हे मान्य करतो की आता माझ्यामध्ये पूर्वीसारखी ताकद राहिलेली नाही. मला झालेल्या दुखापतींमुळे माझे शरीर आता मला साथ देत नाही. सुरू असलेल्या प्रॅक्टिसचा मला खूप त्रास होत आहे. त्यामुळे मी हा निर्णय घेतलेला आहे. माझे पुढील आयुष्य कसे असेल याबद्दल मला पूर्ण खात्री आहे.” असे तो म्हणाला.

 

ग्रँडहोमच्या क्रिकेटमधील कारकिर्दी विषयी बोलायचे झाल्यास त्याने आजवर न्युझीलँड संघासाठी दमदार कामगिरी केली आहे. त्याच्या नावावर आतापर्यंत दोन शतके आणि पंधरा अर्धशतके आहेत. आपल्या फलंदाजीने त्याने 91 विकेट्स आपल्या नावे नोंदवले आहे. जून मध्ये झालेल्या हंगामात त्याने न्युझीलँडसाठी शेवटचा सामना खेळला होता. सध्या सोशल मीडियावर त्याला झालेल्या दुखापतींची प्रचंड चर्चा होत आहे. तसेच चाहते त्याच्या प्रकृती विषयी चिंता व्यक्त करत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button