Breaking | भाजपच्या ‘या’ मंत्र्याचे कोरोनाने निधन; मोदींनी व्यक्त केली हळहळ

दिल्ली | दिवसेंदिवस कोरोनामुळे अनेक रुग्णांना प्राण गमवावे लागत आहेत. सामान्य नागरिकांपासून ते राजकीय नेते असा सध्या कोरोनाचा प्रवास सुरू आहे. या कोरोना विषाणूमुळे देशातील अनेक बड्या नेत्यांना प्राण गमवावे लागले आहेत. आत्ताचं काही दिवसांपूर्वी काँग्रेसचे खासदार राजीव सातव यांचे निधन झाले त्यांच्या निधनाची बातमी ताजी असताना भाजपचे उत्तर प्रदेशचे पुर नियंत्रण आणि महसूल राज्यमंत्री चारथवाल विधानसभा मतदार संघाचे आमदार विजय कश्यप (vijay kashyap) यांचे कोरोनाने निधन झाले आहे.
काही दिवसांपूर्वी त्यांना कोरोनाची बाधा झाली होती. त्यानंतर त्यांना रुग्णालयात उपचार घेण्यासाठी दाखल करण्यात आले मात्र मंगळवारी त्यांची अचानक प्रकृती खालावली आणि त्यांना हे जग सोडून जावं लागलं आहे. त्यांच्या निधनानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हळहळ व्यक्त केली आहे. पंतप्रधान मोदी यांनी ट्विट करून त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. कश्यप हे ५२ वर्षाचे होते. त्यांना मानणारा वर्ग मोठा होता.
ते गरिबांचे नेते म्हणून ओळखले जायचे. त्यांनी मंत्री पदाची घेतलेली जबाबदारी ते उत्तम रित्या पार पाडून त्यांनी त्यांच्या कामाचा ठसा पूर्ण राज्यात पसरवला होता. त्यांच्या जाण्याने भाजप मधील एक निष्ठावंत कार्यकर्ता गमावल्याचे भाजप मधील नेते सांगत आहेत. कश्यप यांच्या निधनानंतर पूर्ण महाराष्ट्रातील जनतेमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.