बॉलिवूडचा सिंघम ‘अजय देवगण’ची मुलगा पुन्हा एकदा ट्रोल…

मुंबई ,:बॉलिवूड चा ‘सिंघम’ अजय देवगन आणि काजोल यांची मुलगी न्यासा देवगण अनेकदा सोशल मीडियावर चर्चेत असते. न्यासादेखील इतर स्टार किड्सप्रमाणे लोकप्रिय आहे. 18 वर्षांची न्यासा जेव्हाही घराबाहेर पडते तेव्हा फोटोग्राफर्स तिचे फोटो काढण्यासाठी तिच्या मागे पळताना दिसतात. त्यामुळेच न्यासा इतर कलाकारांच्या मुलांप्रमाणेच सोशल मीडियावर चर्चेत असते.
मधल्या काळात तिच्या फोटोला बऱ्याच नेटकऱ्यानी ट्रोल केलं होत. आजही बऱ्याचदा काही नेटकरी ट्रोल करताना दिसतात. फक्त याची करण वेगळी आहेत.
न्यासाने इन्स्टाग्रामवर तिच्या चाहत्यांसह स्वतःचा एक फोटो शेअर केला आहे.
फोटोमध्ये तिच्यासोबत मित्रही आहेत. फोटोत, काजोलची मुलगी तिच्या मैत्रिणीसोबत हिरव्या रंगाच्या क्रॉप टॉपमध्ये पोज देताना दिसत आहे. त्याचवेळी, तिच्या मैत्रिणीने काळ्या रंगाचा ड्रेस परिधान केला आहे.
न्यासाच्या फोटोवर चाहते कमेंट करत आहेत. नेटकऱ्यांनी न्यासाला तिच्या कपड्यांमुळे ट्रोल देखील करायला सुरुवात केली आहे. याआधी ही न्यासाचे अनेक बोल्ड फोटो समोर आलेत आहेत.
नेटकऱ्यांकडे लक्ष देऊ नका.. न्यासानं केली होती पोस्ट… :
बातम्यांनुसार, न्यासा नंतर आई काजोल आणि वडील अजय देवगण यांच्या चित्रपटांमध्येही न्यासा करिअर करू शकते. एक चांगला पिता असल्याने अजय नेहमीच न्यासाला ट्रोल करणाऱ्यांकडे लक्ष देऊ नका असा सल्ला देतो. हे न्यासानेच एका पोस्टद्वारे सांगितले आहे.
न्यासा दिवाळी पार्टीत भूमी पेडणेकरच्या पार्टीत आली होती. तेव्हा तिनं गोल्डन लेहंगा घातलेला. ग्लॅमरस अंदाजामुळे भलतीच चर्चेत आहे. पण या दिवाळी पार्टीतील फोटो पाहून नेटिझन्स न्यासाला जोरदार ट्रोल करताना दिसत आहेत. सर्वचजणं अंदाज लावत आहेत की तिनं चेहऱ्याची सर्जरी केली असावी. पण त्याबाबत अजूनही खुलासा झाला नाही.