बॉलिवूड हादरलं! ‘ये रिश्ता क्या कहलाता हैं’ फेम प्रसिध्द अभिनेत्रीची आत्महत्या; चित्रपटसृष्टी हादरली

मुंबई | साऊथ चित्रपटसृष्टी असो की बॉलिवूड असो गेल्या दोन वर्षांपासून आत्महत्या करताना अनेक कलाकार दिसत आहेत. कुणी वैयक्तिक आयुष्याला जिम्मेदार ठरवून आत्महत्या करतो. तर कुणी सफलता मिळत नाही आणि नैराश्य येतं यामुळं आत्महत्या करत असतो. काही दिवसापूर्वी बॉलिवूड मधिल एका मॉडेल ने आत्म्हत्या केली. आता मात्र साऊथ चित्रपटसृष्टीतील मॉडेलन आत्महत्या करून सुसाईड नोट लिहली आहे.

Join WhatsApp Group

 

मागील दोन वर्षांपूर्वी सुशांत सिंग राजपूत यान आत्महत्या केली होती. कुणी म्हणतंय की हा खून आहे तर कुणी म्हणतंय की ही आत्महत्या आहे. त्याचे सर्व बँक डिटेल्स तपासले गेले. जवळ जवळ कोट्यवधीची प्रॉपर्टी सोडून तो कायमचा निघून गेला. असा व्यक्ती कसा काय आत्महत्या करेल असा प्रश्न पडतो. यामागील सत्य कारण अजूनही समोर आल नाही. 

 

गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूड मधील अनेक दिग्गज कलाकार जगाचा निरोप घेत आहेत. 2021 आणि 2022 या दोन वर्षात अनेक दिग्गजांनी या जगाचा निरोप घेतला आहे. त्यामुळे अभिनय क्षेत्राला झालंय तरी काय? असा थेट सवाल व्यक्त केला जात आहे. बॉलीवुड असो वा मनोरंजन विश्व दोन्ही कडील कलाकार आज जगाचा निरोप घेताना पाहायला मिळत आहेत.

 

नुकतेच बॉलीवुड मधील प्रसिध्द अभिनेते राजू श्रीवास्तव यांची प्राणज्योत मावावळली, त्यांच्या निधनाने पूर्ण देशावर शोककळा पसरली होती. हृदय विकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाल्याचे सांगण्यात येत आहे. अनेक दिवस रुग्णालयात उपचार घेऊन देखील त्यांची प्रकृती सुधारली नाही. आणि अखेर त्यांचे निधन झाले आहे.

 

अशातच ‘ये रिश्ता क्या कहलाता हैं’ या मालिकेत मुख्य भूमिकेत दिसलेली प्रसिध्द अभिनेत्री वैशाली टक्करने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटने मुळे चित्रपट सृष्टीत शोककळा पसरली आहे. अभिनेत्रीने गळफास लावून आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे.

 

अभिनेत्रीने आपल्या इंदोरच्या राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केली आहे. अभिनेत्रीने सुसाईड नोटसुद्धा लिहली आहे. छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री वैशाली ठक्कर गेल्या एक वर्षांपासून इंदोरमध्ये राहात होती. अभिनेत्रीच्या आत्महत्येची माहिती समोर येताच, पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button