बॉलिवूड हादरलं! प्रसिध्द अभिनेता रणवीरच्या वडिलांचे निधन; अनेक चित्रपटांची केली होती निर्मिती

मुंबई | गेल्या अनेक दिवसांपासून अभिनय क्षेत्रातील अनेक दिग्गज कलाकार जगाचा निरोप घेत आहेत. त्यामुळे अभिनय क्षेत्राला झालंय तरी काय? असा थेट सवाल व्यक्त केला जात आहे. लता मंगेशकर, बप्पी लहरी, रमेश देव, केके, पुनीत राजकुमार, या सारख्या अनेक दिग्गजांनी जगाचा निरोप घेतला आहे.

 

पुनीत राजकुमार यांच्या निधनाने तर पूर्ण अभिनय क्षेत्रात खळबळ उडाली होती. व्यायाम करत असताना त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला होता. त्यामुळे पूर्ण देशात शोक व्यक्त करण्यात आला होता. अभिनय क्षेत्रात खळबळ उडाली होती.

Advertisement

 

त्यामुळे अभिनय क्षेत्राला कोणाची नजर तर लागली नाही ना? असा सवाल व्यक्त केला जात आहे. आज आणखी एका दिग्गज निर्मात्याने जगाचा निरोप घेतला आहे. अनेक चित्रपटांमध्ये भूमिका साकारून करोडो चाहत्यांच्या मनावर राज्य करणाऱ्या निर्मात्याने आज जगाचा निरोप घेतला आहे.

Advertisement

 

प्रसिध्द बॉलीवुड अभिनेता रणवीर शोरे याच्या वडिलांचे निधन झाले आहे. केडी शोर असे त्यांचे नाव होते. ८०च्या दशकात चित्रपट सृष्टीत त्यांचा एक वेगळा दरारा होता. त्यावेळी त्यांनी अनेक चित्रपट दिले, गुलशन ग्रोवर, मुकेश खन्ना, कादर खान, परेश रावल यांच्या सारख्या दिग्गजांबरोबर त्यांनी चित्रपटांची निर्मिती केली होती.

 

त्यांच्या निधनाने त्यांच्या पुत्राने सोशल मीडियावर एक भावूक पोस्ट लिहिली आहे. केडी यांच्या निधनाने अभिनय क्षेत्रात खूप मोठी पोकळी निर्माण झाली आहे. करोडो चाहत्यांना हा खूप मोठा धक्का मानला जात आहे. अनेक दिग्गजांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.

पूर्ण बातमी वाचा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *