बॉलिवुड हादरलं! वेलकल, हेराफेरी सारख्या १००हून अधिक चित्रपट केलेल्या निर्मात्याचे निधन; देशावर शोककळा

मुंबई | गेल्या अनेक दिवसांपासून चित्रपट सृष्टीतील अनेक दिग्गज मान्यवर जगाचा निरोप घेत आहेत. त्यामुळे अभिनय क्षेत्राला झालंय तरी काय? असा सवाल उपस्थित केला जात आहे. बॉलिवुड तसेच हॉलिवुड मधील अनेक मान्यवर जगाचा निरोप घेत आहेत.

 

यात मराठी चित्रपट सृष्टीवर देखील अनेक संकटे आली आहेत. लता दीदी, बप्पी लहरी, रमेश देव, केके या सारख्या दिग्गज कलाकार आज काळाच्या पडद्याआड गेले आहेत. संगीत विश्वातील अनेक कलाकारांनी देखील जगाचा निरोप घेतला आहे. त्यामुळे अभिनय क्षेत्राला झालंय तरी काय? असा थेट सवाल व्यक्त केला जात आहे.

 

अनेक जणांच्या निधनाच्या बातम्या ताज्या असताना आणखी एका दिग्गज निर्मात्याने जगाचा निरोप घेतला आहे. त्यामुळे सदर घटनेचे पडसाद थेट बॉलिवुडवर पडले आहेत. हृदविकाराचा झटका आल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले.

 

त्यानंतर त्यांची प्रकृति बिघडत गेली. आणि अखेर त्यांनी जगाचा निरोप घेतला आहे. ते ९१ वर्षाचे होते. वेलकम आणि हेराफेरी सारख्या दिग्गज चित्रपटांचे निर्माते अब्दुल गफ्फार नाडीयादवाला यांनी जगाचा निरोप घेतला आहे.

 

सांगितले जाते की ९०च्या दशकात त्यांनी चित्रपट सृष्टीवर एक वेगळा दबदबा निर्माण केला होता. त्यांनी अनेक ब्लॉकबस्टर चित्रपटांची निर्मिती केली होती. १००हून अधिक चित्रपटांची त्यांनी निर्मिती केली आहे. ते एक प्रसिध्द निर्माते म्हणून देखील ओळखले जात होते.

 

मात्र त्यांच्या निधनाने पूर्ण देशात हळहळ व्यक्त केली जात आहे. त्यांचा मृत्यू पहाटे १.३० वाजता झाला आहे. त्यांच्यावर ब्रीच कँडी रूग्णालयात उपचार सुरू होते. मात्र अखेर काळाने त्यांच्यावर घाला घातला आहे. त्यांच्या निधनानंतर अनेक दिग्गजांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button