बॉलिवूड हादरलं! प्रियांका चोप्रा आणि कतरिना कैफच्या गुरूचे निधन; १००हून अधिक चित्रपटात साकारली होती भूमिका

दिल्ली | बॉलीवूडमधून एक दुःखद बातमी समोर आली आहे. राजा हिंदुस्तानी या चित्रपटातील एका मोठ्या अभिनेत्याचे निधन झाले आहे. त्याच्या निधनाने पुन्हा एकदा बॉलीवुड दुःखात आहे. बॉलीवुडमध्ये त्याने आता पर्यंत अनेक प्रसिद्ध चित्रपटांमध्ये भूमिका केल्या होत्या. अभिनय क्षेत्रा बरोबर ते एक उत्तम कथ्थक नृत्यकार होते.

 

बॉलिवूडमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून कलाकारांचे निधन होत आहे. सध्या राजू श्रीवास्तव यांची प्रकृती चिंताजनक असून त्यांच्यावर देखील उपचार सुरू आहेत. त्यांच्या मेंदूची नस दबल्याने मेंदू पर्यंत ऑक्सिजन पोहोचत नाही अशी माहिती काल समोर आली होती. अशात सध्या सर्व चाहते त्यांच्यासाठी प्रार्थना करत आहेत.

Advertisement

 

त्याच बरोबर काही दिवसांपूर्वी दीपेश भान या अभिनेत्याने देखील या जगाचा निरोप घेतला आहे. सध्या त्यांचे कुटुंबीय आर्थिक संकटात आहे. त्यांनी आपल्या घरासाठी ५० लाखांचे कर्ज घेतले होते. मात्र हे कर्ज फेडण्यासाठी आता ते आपल्यात नाहीत. त्यामुळे त्यांच्या पत्नीला हे कर्ज फेडावे लागणार आहे.

Advertisement

 

त्यासाठी त्यांच्याकडे सध्या पैसे नसल्याने त्या मोठ्या आर्थिक संकटात आहेत. दीपेश भान याच्या बरोबर अनेक गायक तसेच कलाकारांनी या जगाचा निरोप घेतला आहे. कलाकारांच्या निधनाचे हे सत्र कायम सुरूच आहे. यामध्ये आता आमिर खान तसेच प्रियंका चोप्रा अशा बॉलीवूड कलाकारांचे गुरू असलेले विरू कृष्णन यांचे देखील निधन झाले आहे.

 

त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये सहाय्यक कलाकाराची भूमिका केली होती. राजा हिंदुस्तानी आणि इश्क या चित्रपटातील त्यांच्या भूमिका खूप गाजल्या होत्या. ते एक उत्तम कथ्थक गुरू होते. प्रियंका चोप्रा आणि कॅटरिना कैफ सारख्या अनेक कलाकारांनी त्यांच्याकडे कथ्थक नृत्याचे धडे घेतले होते.

 

त्यांच्या निधनाने पुन्हा एकदा बॉलीवुड हादरून गेले आहे. अनेक कलाकार तसेच चाहते त्यांच्या निधनावर शोक व्यक्त करत आहेत. वृद्धापकाळाने त्यांनी या जगाचा निरोप घेतला. ७ सप्टेंबर २०१९ रोजी त्यांची प्राण ज्योत मालवली.

पूर्ण बातमी वाचा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *