आत्ताच्या घडामोडीमनोरंजन

बॉलिवूड हादरलं! राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या गायकाचे निधन; 200हून अधिक गाण्यांना दिला होता आवाज

दिल्ली | गेल्या काही दिवसांपासून अभिनय क्षेत्रातील अनेक दिग्गज कलाकार जगाचा निरोप घेत आहेत. कलाकारांच्या निधनामुळे चित्रपट सृष्टीला कोणाची नजर तर लागली नाही ना? असा सवाल देखील उपस्थित केला जात आहे. अनेक दिग्गजांनी काही कालावधी पूर्वी जगचा निरोप घेतला आहे.

 

आत्ताच एक अशीच धक्कादायक बातमी समोर आली आहे. एका दिग्गज गायकाचे निधन झाले आहे. त्यांनी वयाच्या 83व्या वर्षी जगाचा निरोप घेतला आहे. त्यामुळे पूर्ण देशात शोककळा पसरली आहे. दिग्गज गायक शिवमोग्गा सुबन्ना यांनी जगाचा निरोप घेतला आहे.

 

बंगुळूरू येथील एका खासगी रुग्णालयात ते उपचार घेत होते. गेल्या काही दिवसांपूर्वी त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र त्यांच्या प्रकृतीत विशेष सुधारणा आली नाही. आणि त्यांची प्राणज्योत मावळली आहे.

 

सुबन्ना हे कन्नड भाषेतील गायक होते. त्यांनी हिंदी आणि इतर अनेक भाषांमध्ये गाणी गाऊन कला विश्वात एक वेगळी ओळख निर्माण केली होती. त्यांच्या निधनाच्या बातमीने कला विश्वास मोठी शोककळा पसरली आहे. अनेक दिग्गजांनी त्यांना श्रद्धांजली देखील अर्पण केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button