बॉलिवूड हादरलं! 90 व्या शतकातील दिग्गज दिग्दर्शक इस्माईल श्रॉफ पंचतत्वात विलीन..

मुंबई | सिने जगतातून दररोज काही ना काही दु:खद बातम्या येत आहेत. त्यातच आता एक भर पडलीय. बॉलिवूडचे प्रसिद्ध दिग्दर्शक इस्माईल श्रॉफ यांचे निधन झाले आहे. त्यांच्या निधनामुळे बॉलिवूडमध्ये शोककळा पसरली आहे. एकेकाळी ते खूप लोकप्रिय दिग्दर्शक होते.

Join WhatsApp Group

 

 

त्यांनी अनेक बॉलिवूड कलाकारांसोबत काम केले. मिळालेल्या माहितीनुसार, 29 ऑगस्ट रोजी त्यांना ब्रेन स्ट्रोक हा आजार होता. तेव्हापासून त्यांच्या शरीराच्या उजव्या भागाने काम करणे बंद केले. त्यांना बराच काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले.

 

 

वयाच्या 65 व्या वर्षी कोकिलाबेन धीरूभाई अंबानी या हॉस्पिटलमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते मूळचे आंध्र प्रदेशचे रहिवाशी होते. आहिस्ता आहिस्ता’, ‘बुलंदी’, ‘थोडी सी बेवफाई’, ‘सूर्या’ या चित्रपटांचे दिग्दर्शन केलं आहे. एवढच नाही तर त्याकाळी त्यांनी सलमान खान तसेच विनोद खन्नासह देखील काम केलं होत.

 

 

या कलाकारांसह केलं काम:
‘निश्चय’ या सिनेमाचं दिग्दर्शन त्यांनीच केल होत.या सिनेमात सलमान खान, विनोद खन्ना, करिश्मा कपूर हे देखील या सिनेमात होते. त्याचप्रमाणे ‘थोडीशी बेवफाई’ या चित्रपटापासून त्यांना प्रसिद्धी मिळाली. या चित्रपटात शबाना आझमी,पद्मिनी कोल्हापुरे,राजेश खन्ना यांनी यात काम केलं होत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button