बॉलीवुड हादरलं! प्रसिध्द गायकाचे अपघातात निधन; 42व्या वर्षी घेतला जगाचा निरोप

मेलबर्न | गेल्या काही दिवसांपासून अभिनय क्षेत्रातील अनेक दिग्गज मान्यवर जगाचा निरोप घेत आहेत. त्यामुळे अभिनय क्षेत्राला झालंय तरी काय? असा सवाल व्यक्त केला जात आहे. मराठी, बॉलिवूड तसेच हॉलिवुड मधील अनेक दिग्गज कलाकारांचा मृत्यू होत आहे.
त्यामुळे 2022 हे वर्ष अभिनय विश्वासाठी धोकादायक म्हटले जात आहे. मागील दोन वर्षात गायन विश्वातील अनेक दिग्गज कलाकारांनी जगाचा निरोप घेतला आहे. यात लता मंगेशकर, बप्पी लहरी, केके, सिद्धू मुसेवाला या सारख्या दिग्गजांनी जगाचा निरोप घेतला आहे.
त्यामुळे गायन क्षेत्राला न भरणारी पोकळी पडली आहे. अशीच अजून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. प्रसिध्द भारतीय गायकाचे अपघातात निधन झाले आहे. मेलबर्न येथे त्याचा कार अपघात झाला. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला आहे.
पंजाबी आणि हिंदी गाणी गाऊन चित्रपट सृष्टीत नाव कमविलेले निरवैर सिंह यांचे निधन झाले आहे. मृत्यू समयी त्यांचे 42 वय होते. त्यांच्या निधनाने चित्रपट सृष्टीत शोककळा पसरली आहे. मेलबर्न मध्ये ते जाात असताना त्यांना अपघात झाला. त्यांच्या सोबत त्यांचा एक साथीदार होता. मात्र तो गंभीर जखमी झाला आहे.
सिंह यांच्या निधनाने बॉलीवुड ला देखील मोठा धक्का बसला आहे. ते गेल्या 9 वर्षांपूर्वी ऑस्ट्रेलिया मध्ये राहायला गेले होते. ऑस्ट्रेलिया मधून ते काम पाहत होते. मात्र अचानक त्यांचे निधन झाले. अनेक बड्या चित्रपटांमधील गाण्यांसाठी त्यांनी ऑर्डर्स देखील घेतल्या होत्या.