बॉलिवूड हादरलं! प्रसिध्द अभिनेत्याचे निधन; हिंदी चित्रपट सृष्टीवर शोककळा
दिल्ली | दाक्षिणात्य सिनेसृष्टीत सध्या अनेक कलाकारांचे निधन होत आहे. काही दिवसांपूर्वीच सार्थ चंदन या तरुण अभिनेत्याचे निधन झाले. तसेच प्रताप पोथेन यांनी देखील या जगाचा निरोप घेतला. या कलाकारांच्या निधनाने अभिनय क्षेत्रात मोठी खळबळ उडाली.
अंगमली डायरीज या चित्रपटात सार्थ चंदनने उत्तम अभिनय केला होता. याच चित्रपटाने त्याला खूप प्रसिध्दी मिळवून दिली. अशात सध्या राजू श्रीवास्तव यांच्या तब्येतीविषयी देखील चिंता व्यक्त केली जात आहे. गेले चार दिवस ते एम्स रुग्णालयात दाखल आहेत. डॉक्टर त्यांना वाचवण्यासाठी खूप प्रयत्न करत आहेत.
तसेच आता आणखीन एका दिग्गज अभिनेत्याचे निधन झाले आहे. यामुळे दाक्षिणात्य सिनेसृष्टी हादरून गेली आहेत. दिग्गज अभिनेते प्रदीप कोट्टायम यांचे निधन झाले आहे. त्यांच्या निधनाने सगळीकडे शोकाकुल वातावरण पसरले आहे. गुरुवारी पहाटे ४ वाजता त्यांची प्राणज्योत मालवली. वयाच्या ६१ व्या वर्षी ते अनंतात विलीन झाले आहेत.
दोन दिवसांपूर्वीच त्यांना खूप अस्वस्थ वाटत होते. त्यामुळे त्यांना एका खाजगी रुग्णालयात दाखल केले गेले. इथे उपचार सुरू असतानाच त्यांना हृदय विकाराचा झटका आला. यातच त्यांचे निधन झाले. मल्याळम आणि तमिळ चित्रपट सृष्टीच्या प्रसिध्दीमध्ये त्यांचे महत्वपूर्ण योगदान आहे.
साल २००१ मध्ये ‘ई नाडू इनले वारे’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. यात त्यांनी महत्वाची भूमिका साकारली. त्यांच्या अभिनयाच्या कारकिर्दीतील हा प्रथम चित्रपट होता. “विनयथांडी वरुवाया” या चित्रपटातील त्यांच्या अभिनयाचे देखील नेहमी कौतुक होते. त्यांनी या चित्रपटात त्रिशाच्या काकांची भूमिका साकारली होती.
“विनयथांडी वरुवाया” या चित्रपटातून त्यांना अफलातून प्रसिध्दी मिळाली. त्यांच्या निधनाने दाक्षिणात्य सिनेसृष्टीत शोककळा पसरली आहे. त्यांच्या पश्चात पत्नी माया आणि दोन मुलं आहेत. सर्व जण त्यांच्या निधनाने भावूक झाले आहेत. तसेच त्यांना श्रद्धांजली वाहत आहेत.
प्रदीप यांनी त्यांच्या कारकिर्दीत – थट्टाथिन मरायाथु, आडू ओरू भीगरा जीवी, वेलकम टू सेंट्रल जेल, लाइफ ऑफ जोसुट्टी, कुंजीरमायनम, ओरु वडाक्कन सेल्फी, अमर अकबर अँटनी, कट्टापनायले ऋत्विक रोशन या आणि अशा अनेक तमिळ तसेच मल्याळम भाषिक चित्रपटांमध्ये अभिनय केला आहे.