आत्ताच्या घडामोडीबॉलीवुड

बॉलीवुड हादरलं! प्रसिध्द अभिनेत्याचे निधन; अभिनय क्षेत्रात शोककळा

मुंबई | तामिळ अभिनेता पू रामू यांचे 27 जून रोजी चेन्नईतील राजीव गांधी रुग्णालयात निधन झाले. ते 60 वर्षांचे होते. शुक्रवारी (24 जून) त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यांना रुग्णालयात नेण्यात आले. काही दिवस उपचार सुरू होते मात्र सोमवारी त्यांचा मृत्यू झाला. त्यांना श्रद्धांजली म्हणून त्यांचे पार्थिव उरापक्कम येथील त्यांच्या निवासस्थानी ठेवण्यात नेण्यात आले आहे.

 

पू रामू शेवटचे सुधा कोंगारा प्रसाद दिग्दर्शित ‘सुर्या की सूरराई पोतरु’ मध्ये दिसले होते. ते चित्रपट अभिनेते तसेच पथनाट्य कलाकार होते. मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांनी पू रामू यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे.

 

तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांनी पू रामू यांच्या कुटुंबाप्रती शोक व्यक्त केला. आपल्या वक्तव्यात एमके स्टॅलिन यांनी सांगितले की, ” पू रामू हे पथनाट्य कलाकार होते, ते डाव्या विचारसरणीच्या लोकांपर्यंत पोहोचायचे.” उदयनिधी स्टॅलिन यांनीही पू रामू यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

 

पू रामू हे नाव त्यांना त्यांच्या एका चित्रपटामुळे मिळाले होते. साल 2008 मध्ये त्यांनी पू चित्रपटात काम केले. या चित्रपटाच्या निर्मात्या ससी होत्या. हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर लोक त्यांना पू रामू म्हणू लागले. चित्रपट निर्माते आणि चाहते रामू यांना पू रामू म्हणू लागले. पू नंतर, पू रामू यांनी अनेक चित्रपटांमध्ये काम केले. ज्यासाठी ते नेहमीच चाहत्यांच्या लक्षात राहतील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button