बॉलीवुड हादरलं! प्रसिध्द अभिनेत्याच्या जवळच्या व्यक्तीचे निधन

मुंबई | गेल्या काही महिन्यांपासून बॉलिवूड क्षेत्राला उतरती कळा लागलेली दिसून येत आहे. एक एक करून प्रसिद्ध अभिनेत्यांचे एका पाठोपाठ एक असे निधन होतच चालले आहे. वर्ष २०२२ हे अभिनय क्षेत्राला दुःखाच्या खाईत लोटणारेच म्हंटले तरी कमी नाही. बॉलिवूड क्षेत्र नव्हे तर मराठी अभिनय क्षेत्रातील दिग्गज अभिनेत्यांचे निधन झाल्याचे समोर आले आहे. अशातच एक ताजी दुःखाची खबर पुढे आली आहे.
बॉलिवूड मधील प्रसिद्ध अभिनेते मनोज वाजपेयी यांच्या आईचे निधन झाल्याचे समोर आली आहे. मनोज वाजपेयी हे एक आपल्या दमदार अभिनयाने यशाचे शिखरावर पोहोचले आहेत. त्यांनी अनेक चित्रपटामध्ये काम केले आहे. त्यांनी त्यांच्या कामगिरीने आपले नाव रोशन केले. अशा या अभिनेत्यासोबत दुःखद बातमी समोर आली आहे. गीता बाजपेयी या अभिनेते मनोज यांच्या आई होत्या. त्यांचे वय 80 वर्ष होते. गीता यांची तब्येत बिघडली होती म्हणून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. ऊपचार चालू असतानाच त्यांनी आज सकाळी 8 डिसेंबर रोजी श्वास घेतला.
गेल्या बरेच दिवसांपासून गीता वाजपेयी या रुग्णालयात उपचार घेत होत्या. त्यांच्या आरोग्यात सुधारणा देखील होत होत्या. परंतु परवा अचानक तब्येत जास्त बिघडली आणि डॉकटर त्यांचा जीव वाचवू शकले नाहीत. कायम कामात व्यस्त असणारे मनोज वाजपेयी हे वेळात वेळ काढून आईसाठी दवाखान्यात हजर राहत होते. आईची विचारपूस करत होते. त्यांच्या आईची काळजी देखील घेत होते.
गेल्या वर्षी च मनोज वाजपेयी यांच्या वडिलांचे निधन झाले होते. त्यांच्या वडिलांचे नाव राधाकृषण वाजपेयी. यांच्या निधनानंतर मनोजच्या आईनेही साथ सोडली. आईने शिकवलेल्या गोष्टी मनोज हे कायम स्मरणात ठेवत. त्यांच्या आईचे त्यांच्या सोबतचे नाते चांगले होते. वडीलांच्या निधनानंतर आईचे झालेले निधन हे मनोज यांच्यासाठी हे दुःख मोठे होते.
जो यशस्वी होत नाही त्याला कधीच कमी समजू नये ही त्याच्या आईची शिकवण मनोज हे कायम लक्षात ठेवत असत. मनोज आईच्या जाण्यामुळे अतिशय दुःखी झाला आहे. त्याच्या आईच्या निधनामुळे त्याच्या डोक्यावरचा हात आधार कमी झाला आहे. परंतु आईच जगात नसल्याने मनोज वाजपेयी यांच्यावर दुःखाचा डोंगर पसरला आहे. मनोज च्या चाहत्यामधून हळहळ व्यक्त होताना दिसत आहे.