आत्ताच्या घडामोडीबॉलीवुड

बॉलिवूड हादरलं! बिग बॉस फेम दिग्गज अभिनेत्रीचे निधन; सिद्धार्थ नंतर चित्रपट सृष्टीवर पुन्हा शोककळा

मुंबई | बिग बॉस हा सर्वात बदग्रास शो आहे. मात्र यामध्ये आलेला प्रत्येक स्पर्धक हा यशाचे मोठे शिखर गाठत असतो. अशात आता बिग बॉसच्या या घराला कुणाची तरी नजर लागली की काय असा सवाल नेटकऱ्यांकडून उपस्थित केला जात आहे. बिग बॉसच्या घरातील एका जुन्या स्पर्धकाचे निधन झाले आहे. या महिला स्पर्धकाने बिग बॉसच्या घरात मोठी मजल मारली होती.

 

बिग बॉसच्या घरात आपण नेहमीच वाद होताना पाहिलेत. अशात बिग बॉसच्या १३ व्या सीजनचा विजेता ठरलेला अभिनेता सिद्धार्थ शुक्ला हा देखील आपल्याला हृदयविकाराच्या झटक्याने सोडून गेला. त्याचे निधन झाले त्यावेळी सर्वांना मोठा धक्का बसला होता. कारण तो नेहमीच स्वतःच्या तब्येतीकडे जास्त लक्ष द्यायचा. फिट राहणे जिम करणे या सर्व गोष्टी त्याला फार आवडायच्या. मात्र या सर्वांमध्ये त्याचा मृत्यू झाल्याने त्याची गर्लफ्रेंड शहनाज गिल ही फार दुःखात होती.

 

सिद्धार्थ शुक्लाच्या मृत्यू वेळी माध्यमांवरती तसेच सोशल मीडियावरती श्रद्धांजलीचा मोठा पूर आला होता. सर्व चाहते तसेच मनोरंजन विश्वातील सर्व दिग्गज मंडळी त्याच्या निधनामुळे पूर्णतः हादरून गेले होते. अनेकांना ही बातमी त्यावेळी सुरुवातीला खोटी वाटत होती. मात्र ज्यावेळी त्यांना याची खात्री पटली तेव्हा अनेक चाहत्यांच्या पायाखालची जमीन सरकली होती.

 

सिद्धार्थने बिग बॉस 13 मध्ये उत्तम कामगिरी केली. तो नेहमीच घरामध्ये प्रत्येक टास्क हुशारीने आणि चलाकीने पूर्ण करायचा. त्यामुळेच बिग बॉस 13 चा तो विजेता झाला होता. अशात आता बिग बॉस 14 ची एक स्पर्धक देखील आपल्याला सोडून फार दूर निघून गेली आहे. तिच्या निधनामुळे राजकीय विश्वात देखील मोठी खळबळ उडाली आहे. तिची मनोरंजन आणि राजकीय विश्वशी असलेली बांधिलकी फार मोठी होती.

 

बिग बॉसची जुनी स्पर्धक राहिलेली सोनाली फोगट आता आपल्या मध्ये नाही. हृदयविकाराच्या झटक्याने तिचे निधन झाले आहे. सोनालीने भारतीय जनता पार्टीमधून आमदारकीची निवडणूक देखील लढवली होती. टिक टॉक वर प्रचंड सक्रिय असल्याने तिचा चाहता वर्ग फार मोठा होता. त्यामुळेच बीजेपी कडून तिलाही संधी देण्यात आली होती. या संधीचे सोने करून दाखवण्याचा तिने निर्णय घेतला होता. हरियाणातील हिस्सार जिल्ह्यातील अदमदपूर विधानसभा मतदारसंघातून ती निवडणूक लढवत होती. साल 2019 मध्ये झालेल्या या निवडणुकीत तिच्यासमोर काँग्रेसचे कुलदीप बिश्नोई हे तगडे उमेदवार होते. त्यामुळे यामध्ये तिचा पराभव झाला.

 

सोनालीने आतापर्यंत काही मालिकांमध्ये काम केले आहे. टिक टॉक नंतर रिल व्हिडिओमध्ये ती सराईत होती. आपल्या अभिनयाच्या जोरावर तिला प्रेक्षकांचे आणखीन भरभरून मनोरंजन करायचे होते मात्र खूप लवकरच तिने या जगाचा निरोप घेतला आहे. वयाच्या 41 व्या वर्षी तिची प्राणज्योत मालवली आहे.

 

तिच्या काही खाजगी कामासाठी ती गोव्याला गेली होती. काल गोव्यामध्ये असतानाच तिचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. सोनाली ही नेहमीच धाडसी स्वभावाची राहिली आहे. बिग बॉसच्या घरामध्ये असताना तिने रुबीना दिलैक बरोबर जोरदार भांडण केले होते. यावेळी सोनालीने तिला जीवे मारण्याची धमकी देखील दिली होती.

 

सोनाली सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असायची. तिचा चहाचा वर्ग फार मोठा आहे. तिच्या निधनामुळे आता राजकीय आणि मनोरंजन विश्वातून तिला भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली जात आहे. सर्व चाहते तसेच मनोरंजन विश्वातील दिग्गज मंडळी देखील तिच्या निधनामुळे दुःखी आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button