बॉलिवूड हादरलं! आणखी एका दिग्गज अभिनेत्रीची आत्महत्या

 

Join WhatsApp Group

इंदोर | सध्या टीव्ही इंडस्ट्री मधून एका मागून एक वाईट बातमी येत आहे. ‘भाभी जी घर पर है’ मधील मलखान उर्फ दिपेश भान यांचे हृदयविकाराच्या झटक्यात निधन झाले होते. तर आज अशीच एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. ये रिश्ता क्या कहलाता है मधील संजू म्हणजेच वैशाली ठक्कर हिने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. तिच्या आत्महत्येच्या बातमीने तिची चाहते हदरले असून सगळ्यांना आश्चर्याचा धक्का बसला आहे.

 

वैशाली ठक्कर हिने टीव्हीवर बराच काळ आपले अधिराज्य गाजवले आहे.वैशालीने लाल इश्क, विष या अमृत, सुपर सिस्टर्स, मनमोहिनी, ये है आशिकी, इत्यादी मालिकांमध्ये अभिनय केला होता. पण ‘ए रिश्ता क्या कहलाता है’ मधून तिने पदार्पण केले होते. त्यात तिने संजनाची भूमिका केली होती.

 

ती इंदूरला आपला भाऊ आणि वडिलांसह राहत होती. सकाळीच तिला पंख्याला लटकलेले पाहून ते चकित झाले. 2021 च्या एप्रिल महिन्यात वैशालीचा साखरपुडा झाला होता. याची माहिती तिने स्वतःच इन्स्टाग्रामवर दिली होती. नंतर काही कारणांनी तिचे हे लग्न मोडले. केनिया येथील डॉक्टर अभिनंदन सिंह याच्याशी तिचा साखरपुडा झाला होता.

 

मात्र तिच्या खासगी जीवनात चलबिचल चालली होती, असं ऐकिवात आहे. तरीपण ती असे पाऊल उचलेल, अशी कोणालाही कल्पना नव्हती. गेल्या काही दिवसांपासून वैशालीने सोशल मीडियाशी देखील फारकत घेतली होती

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button