बॉलीवूड पुन्हा हादरलं! प्रसिध्द अभिनेत्रीचे निधन; चित्रपट सृष्टीवर शोककळा, १००हून अधिक…
दिल्ली | मनोरंजन विश्वात सातत्याने खळबळ जनक घटना घडत आहेत. अनेक प्रसिद्ध कलाकारांचे निधन होत आहे. अशात आता आणखीन एका ज्येष्ठ अभिनेत्रीचे निधन झाले आहे. यावर्षी अनेक कलाकारांनी या जगाचा निरोप घेतला आहे.
या कलाकारांनी अभिनय क्षेत्रात मोठी कामगिरी केली होती. बॉलीवूड तसेच दाक्षिणात्य सिनेसृष्टीत कलाकारांचे निधन होत आहे. रसिक दवे या दिग्गज अभिनेत्याचे काही दिवसांपूर्वी निधन झाले. त्यांना किडनीचा खूप त्रास होत होता. यामध्ये त्यांना मूत्रपिंडाचा आजार देखील झाला. किडनी निकामी झाली असल्यामुळे त्यांचे निधन झाले.
मनोरंजन विश्वात त्यांनी अनेक मालिकांमध्ये काम केले होते. याचबरोबर अभिनेते दीपेश भान यांचे देखील हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. दीपेश भान यांनी त्यांच्या कारकीर्दीत गुजराती तसेच हिंदी मालिका विश्वात काम केले होते. त्यांच्या निधनामुळे गुजराती सिनेसृष्टीवर दुःखाचा मोठा डोंगर कोसळला होता.
या दोन दिग्गज अभिनेत्यांबरोबरच लता मंगेशकर ऋषी कपूर आणि इरफान खान या कलाकारांचे देखील निधन झाले आहे. लता मंगेशकर यांचे निधन झाले तेव्हा अनेक चाहते दुःखाने ग्रस्त झाले होते. ऋषी कपूर यांच्यासारख्या दिग्गज अभिनेत्याच्या निधनानंतर देखील चाहत्यांना शोक अनावर झाला होता. त्याचबरोबर इरफान खान या प्रसिद्ध अभिनेत्याचे देखील कर्करोगाने निधन झाले.
अशात आता आणखीन एका अभिनेत्रीच्या निधनाची बातमी समोर आली आहे. अभिनेत्री मंजू सिंग यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. प्रसिद्ध अभिनेते अमोल पालेकर यांच्या “गोलमाल” या चित्रपटामध्ये अभिनेत्रीने काम केले होते. मंजू यांनी या चित्रपटामध्ये अमोल पालेकर यांच्या बहिणीची भूमिका साकारली होती. या चित्रपटातील त्यांच्या अभिनयाचे सर्वांनीच कौतुक केले होते. अधिकार, स्वराज, एक कहानी अशा काही मालिकांमध्ये देखील त्यांनी अभिनय केला होता.