बॉलीवुड पुन्हा हादरलं! आणखी एका दिग्गज अभिनेत्रीचे निधन; अशोक कुमार यांची होती मुलगी

दिल्ली | गेल्या काही दिवसांपासून अभिनय क्षेत्रातील अनेक दिग्गज मान्यवर जगाचा निरोप घेतला पाहायला मिळत आहे. कला विश्वाला हळूहळू मोठी पोकळी तयार होताना पाहायला मिळत आहे. अनेक दिग्गजांनी जगाचा निरोप घेतल्यामुळे अभिनय क्षेत्राला झालंय तरी काय? असा सवाल व्यक्त केला जात आहे.
आत्ताच नुकतेच ४० दिवस मृत्यू सोबत झुंज देऊन विनोदी अभिनेते राजू श्रीवास्तव यांचे निधन झाले आहे. त्यात आणखी एका प्रसिध्द अभिनेत्रीने देखील जगाचा निरोप घेतला आहे. राजू श्रीवास्तव यांच्यावर अनेक दिवस रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र त्यांच्या प्रकृतीत विशेष सुधारणा आली नाही.
आणि अखेर त्यांनी जगाचा निरोप घेतला आहे. प्रसिध्द अभिनेते अशोक कुमार तुम्हाला आठवत असतील, अनेक बड्या चित्रपटांमध्ये भूमिका साकारून त्यांनी करोडो चाहत्यांच्या मनावर राज्य केलं आहे. ते एक अत्यंत प्रसिध्द अभिनेते म्हणून ओळखले जायचे. सध्या त्यांच्या मुलीच्या निधनाने अभिनय क्षेत्रात शोककळा पसरली आहे.
अशोक यांची मुलगी अभिनेत्री भारती जाफरी यांनी जगाचा निरोप घेतला आहे. त्या अनेक वर्षांपासून दीर्घ आजाराने ग्रस्त होत्या. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र त्यांची मृत्यू सोबत असलेली झुंज अखेर अयशस्वी ठरली आहे आणि त्यांनी जगाचा निरोप घेतला आहे.
त्यांनी अनेक मालिका आणि चित्रपटांमध्ये भूमिका साकारली होती. त्यांचा चाहता वर्ग देखील मोठा होता. मात्र त्यांच्या निधनाच्या बातमीने अभिनय क्षेत्रात शोककळा पसरली आहे. भारती यांना मानणारा एक वेगळा वर्ग होता. त्यांच्या निधनानंतर अनेक दिग्गजांनी श्रद्धांजली अर्पण केली आहे.