बॉलिवूड पुन्हा हादरलं! आणखी एका दिग्गज गायकाचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

दिल्ली | बॉलिवूडवर पुन्हा एकदा दुःखाचे सावट पसरले आहे. प्रसिद्ध गायक केके यांचे हृदविकाराच्या झटक्याने निधन झाले. या बातमीमुळे पुन्हा एकदा सर्वत्र शोककळा पसरली आहे. एका पाठोपाठ एका कलाकाराचा अशा पद्धतीने मृत्यु होन ही खरंच एक चिंताजनक बाब आहे.

 

कोलकातामध्ये त्यांचं निधन झालं आहे. येथील विवेकानंद महाविद्यालयाच्या एका कार्यक्रमात ते लाईव्ह गाणं गात होते. अशात अचानक त्यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र तिथे त्यांना मृत घोषित केले गेले.

 

केके यांच्या सुरावर आपली सिनेसृष्टी खूप गाजली आहे. हम दिल दे चुके सनम या चित्रपटातील ‘तडप तडप के इस दिल से’ हे बहुचर्चित गाणं देखील त्यांनीच गायलं आहे.

 

त्यांनी आपल्या कारकीर्दीत २०० हून अधिक गाणी गायली आहेत. केके यांचं पूर्ण नाव कृष्णकुमार कुन्हात असं आहे. केके यांच्या गाण्यांचा कल हा बॉलिवूड कडे सर्वाधिक होता. त्यांनी इतरही भाषांमध्ये काही गाणी गायली आहेत. गाण्याबरोबर त्यांनी संगीताच्या अनेक रियाली शोमध्ये देखील ते झळकले होते.

 

अशात आता त्यांच्या निधनानंतर संपूर्ण बॉलिवूड कलाकार त्यांना श्रद्धांजली वाहत आहेत. ज्यामध्ये गायक अरमान मलिक, अक्षय कुमार, मनमुन दत्ता असे अनेक कलाकार आणि चाहते सोशल मीडियावर भावपूर्ण श्रद्धांजलीची पोस्ट शेअर करत आहेत.

 

केके यांच्या निधनावर भारताचे पंप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील शोक व्यक्त केला आहे. त्यांनी ट्विट करत असं म्हटलं आहे की, ” केके यांच्या अचानक झालेल्या निधनाने धक्का बसला आहे. त्यांच्या गाण्यांतून अनेक भाव प्रदर्शित व्हायचे. सर्व वयोगटामध्ये त्यांची गाणी लोकप्रिय आहेत.

 

केके त्यांच्या गाण्यांतून कायम आपल्यामध्ये राहतील. त्यांच्या कुटुंबाप्रती आहे आणि चहा त्यांच्या दुःखात मी देखील सहभागी आहे.” केके यांनी काही मालिकांचे टायटल साँग देखील गायले आहेत. ज्यामध्ये जस्ट मोहोबत, शकालका बुमबुम, हिपहिप हुरेंरेरे या मालिकांचा समावेश आहे. यासह ‘पल’ आणि ‘हमसफर’ हे दोन अल्बम देखील काढले होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button