Kk ला रूग्णालयात घेऊन जातानाचा व्हिडिओ व्हायरल; चाहत्यांना फुटला अश्रूंचा बांध

कोलकाता | प्रसिध्द बॉलिवूड गायक केके च्या निधनाने पूर्ण देशात शोककळा पसरली आहे. करोडो लोकांनी त्याला सोशल मीडियावर श्रद्धांजली वाहिली आहे. त्याने 35 हजार गाणी गाऊन करोडो चाहते कमविले आहेत.

 

त्याच्या जाण्याने मोठा धक्का बसला आहे. तो स्टेजवर गाणे गात असताना अचानक तो कोसळला त्यानंतर त्याला तात्काळ रुग्णालयात नेण्यात आले मात्र त्या ठिकाणी गेल्यावर डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

 

Kk ला हृदयविकाराचा झटका आल्याची माहिती देखील डॉक्टरांनी दिली आहे. “हम रहे ना रहे कल” हे गाणं त्याच शेवटच गान ठरलं आहे. त्याला आधीच त्याच्या मृत्यूची चाहूल लागल्या सारखे त्यानं हे गाणं गायलं आहे.

 

त्यामुळे चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. मुळात त्याने बॉलिवूड आणि अभिनय क्षेत्राला 35 हजार गाणी दिली आहेत. यामुळे त्याचा एक वेगळा चाहता वर्ग बनला आहे. त्याच्या अचानक जाण्याने चिंता व्यक्त केली जात आहे.

 

सध्या त्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. त्याला गाणं गात असलेल्या मंचावरून रूग्णालयात नेतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्यामुळे त्या व्हिडिओ मुळे अनेकांना अश्रूंचा बांध फुटला आहे.

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button